मावळ मध्ये ७१.२७ टक्के मतदान

पिंपरी (लोकमराठी) : मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 71.27 टक्के मतदान झाले. मागील विधानसभा निवडणुकीतही मतदानाची एकूण टक्केवारी 71. 2 टक्के होती. मावळामधील एकूण 3,48,462 मतदारांपैकी 2,48,349 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पहिल्या दोन तासांत मावळात 6.74 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सकाळी ११ वाजेपर्यंत ही आकडेवारी 18.33 टक्क्यांवर पोचलेली दिसून आली. दुपारी १ वाजेपर्यंत १ लाख २३ हजार १४३(३५.३४ टक्के) मतदारांनी मतदान केले. दुपारी ३ वाजेपर्यंत ५३.६० टक्के मतदारांनी मतदान केले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 64.36 टक्के मतदारांनी मतदान केले. त्यात 1,17,945 पुरुष तर 1,06,315 महिला मतदारांचा समावेश आहे. मावळात एकूण मतदान 3 लाख 48 हजार 462 आहे.

सकाळी 11 वाजेपर्यंत मावळ मतदारसंघात 65 हजार 631 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 40 हजार 591 पुरुष, 25 हजार 039 महिला व एका तृतीयपंथी व्यक्तीचा समावेश आहे.

सकाळी 11 वाजेपर्यंत झालेले मतदान

65 हजार 631 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
एकूण मतदानाची टक्केवारी – 18.83

सकाळी 9 वाजेपर्यंत झालेले मतदान

23 हजार 472 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
एकूण मतदानाची टक्केवारी – 6.74