१२ वर्षीय मुलीवर आईच्या मित्राकडुनच वारंवार बलात्कार

१२ वर्षीय मुलीवर आईच्या मित्राकडुनच वारंवार बलात्कार

पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) येथे एका बारा वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देत, मुलीच्या आईच्या मित्राकडुनच मागील वर्षभरापासुन मुलीवर बलात्कार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पिडीत मुलीच्या पोटात दोन दिवसापुर्वी वेदना होत असल्याने, मुलीच्या आईने मुलीकडे विचापुस केली असता ही बाब लक्षात आली.

पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी, शाम भाऊराव पवार (वय ३५, रा. लोणीस्टेशन, कदमवाकवस्ती ता. हवेली) या नराधमा विरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापुर्वीच शाम पवार हा फरार झाला असुन, आरोपीच्या अटकेसाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ३० वर्षीय परप्रांतीय महिला ग्रामपंचायत हद्दीत मागिल तीन वर्षापासुन राहत असुन, ती पुणे स्टेशन परीसरात भिक मागुन आपला व आपल्या १२ वर्षीय मुलीचा उदरनिर्हाव करते. आरोपी शाम पवार हा ही पुणे स्टेशन परीसरात भिक मागत असल्याने, ती महिला व शाम हे दोघेजण मागिल दिड वर्षापासुन लिव्ह इन रिलेशनशिपमघ्ये महिलेच्या घरी एकत्र राहत आहेत. ती महिला भिक मागण्यासाठी घरातुन बाहेर पडताच, शाम पवार हा पिडीत मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन मागिल एक वर्षापासुन बलात्कार करत होता. मात्र, शाम पवार याच्याकडुन जिवाची भिती असल्याने, मागिल वर्षभरापासुन पिडीता अत्याचार निपुटपणे झेलत होती.

दरम्यान, मागिल चार दिवसापासून पिडीतेच्या पोटात वेदना होऊ लागल्याने सदर महिला भिक मागण्यासाठी जात नव्हती. यावरुन शाम पवार व महिलेत भांडण झाले. यावेळी शाम पवार याने त्या महिलेला शिवीगाळ व मारहाण केली. याबाबतची महिलेने लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दाखल केली होती.

त्यामुळे शाम पवार याने तक्रार दाखल होण्यापुर्वीच घरातुन पळ काढला होता. दरम्यानच्या काळात पिडीतेच्या पोटातील वेदना वाढल्याने र्पेगनेंट टेस्ट केली असता, पिडूता दोन महिण्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. याबाबत पिडीतेच्या आईने विश्वासात घेऊन विचारना केली असता, शाम पवार याचे कारनाने पुढे आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्सनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. आर. रणवरे करत आहेत.

Actions

Selected media actions