- बैंक ऑफ बडोदा प्रायोजक तत्वावर सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी दिव्यांग मुलांसाठी केला संयुक्तरित्या संकल्प
पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे दिनांक 20 जुलै 2022 रोजी सप्तर्षी फाऊंडेशनच्या विभागीय कार्यालयात विषेश (दिव्यांग) मुलांकरीता मोफत चौथे होमिओपॅथी उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. दिव्यांग मुलांचा सांभाळ करण्यामध्ये पालकांचा वेळ, ऊर्जा, पैसा व काही प्रमाणात आशा संपुष्टात आलेली असते, अशा पालकांसाठी सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. ऑगस्ट २०२१ पासून सुरू केलेल्या या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांगांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळाला आहे.
या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात. नोंदणी झाल्याशिवाय शिबिरास प्रवेश दिला जात नसल्याने गर्दी टाळूनही शेकडो लाभार्थी लाभ घेतात.
या शिबिरात विशेष (दिव्यांग) मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधे देण्यात आली. शिबिरामध्ये पन्नास पेक्षा अधीक लाभार्थ्यांनी लाभ घेतला.विशेष म्हणजे यावेळी औंध मिलेट्री केंद्रातील विशेष मुलांसाठी या वेळेस 20 मुलांना लाभ देऊन संस्थेने देशाच्या संरक्षनासाठी आयुष्यभर झटनारया बांधवांच्या मुलांना ट्रीटमेंट व औषधे देण्यात आली.
सदर शिबिर दिवंगत डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केले जाते, डॉ. प्रफुल्ल विजयकर यांनी 2005 साली सेवा भावातून विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्पची सुरुवात केली. आज पर्यंत विजयकर सरांमुळे हजारो विशेष मुलांना निस्वार्थ भावनेतून शास्त्रशुद्ध होमिओपॅथी उपचार घेता आले आहेत.
सप्तर्षी फाउंडेशनने गेले अनेक वर्षे दिव्यांगा सोबत काम करत आहे, त्यासोबतच संस्थेच्या विविध सामाजिक क्षेत्रातील कामगिरी खालील प्रमाणे आहे.
- स्वर्ग संस्कार अभियाना अंतर्गत 500 पेक्षा अधिक बेवारस मृत व्यक्तींवर अंत्यविधी.
- शीतऋतु संरक्षण अभियानाअंतर्गत 1000 पेक्षा अधिक ब्लॅंकेट वितरण.
- दिव्यांगाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र (UDID) साठी 1500 पेक्षा दिव्यांग व्यक्तींना प्रत्यक्ष मदत.
- निरामय आरोग्य योजनेतून 3000 पेक्षा अधिक क्लेम मंजुरी.
- शेकडो दिव्यांगांना आधार कार्ड व पॅन कार्ड मिळण्यासाठी प्रत्यक्ष मदत.
- विविध आरोग्य शिबिर अंतर्गत 1000 पेक्षा दिव्यांगाच्या कुटुंबांना लाभ.
- कोरोना काळात शेकडो गरजूंना मोफत अन्नधान्य व गरजेच्या वस्तूंचे वितरण.
- दुष्काळ मुक्त मराठवाडा अभियानाअंतर्गत मराठवाड्यात जलसंधारणाचे मोठे कार्य.
शिबाराचे उद्घाटन बैंक ऑफ़ बडोदा चे मैनेजर श्री.स्वप्निल पोतदार, प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे डॉ. रजत मालोकार, झेब्रा थॉट कंपनीचे मालक गणेश बोरसे, आय स्पेशल क्लिनिकचे मालक डॉ. जाधव, संस्थेचे संस्थापक सचिव मनोजकुमार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबिरास मान्यवरांनी उपस्थित राहून सप्तर्षी फाउंडेशन सतत करत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्यासाठी सप्तर्षी फाउंडेशन ला प्रोत्साहन दिले व पुढील कर्यकरिता शुभेच्छा दिल्या.
बँक ऑफ बडोदाच्या स्थापना दिवसानिमित्त पिंपरी शाखा ,मनपा शाखा, चिंचवड शाखा तसेच पिंपळे सौदागर शाखा यांच्या वतीने सदर शिबिराचे प्रायोजकत्व स्वीकारण्यात आले होते. शिबिर पार पाडण्यासाठी बैंक ऑफ बडोदाचे पिंपरी शाखेचे मुख्य व्यवस्थापक अतुल चव्हाण, रितुराज, चिंचवड शाखेचेचे मुख्य व्यवस्थापक नितीन पाटिल, पिंपळे सौदागर शाखेचे मुख्य व्यवस्थापक स्वप्निल पोद्दार, रेन्बो प्लाझाचे चेअरमन नरेश वास्वानी, ब्राइट डेंटल फाऊंडेशनचे डॉ. अभिजीत देशपांडे यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरात प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी तर्फे डॉ. रजत मालोकार, डॉ. निवेदिता हांडे, डॉ. प्रियांका धमाळ, डॉ. नीरज कुलकर्णी, डॉ. रोहित देशमुख, डॉ. दिप्ती मालोकार, डॉ. आश्लेषा देशमुख, डॉ. श्रद्धा लांजेवार व सहायक डॉ अनुक्रमे सौम्य चतुर्वेदी, शिवानी पाल, शिवप्रताप सिंग, होनी ओसवाल, सिमरन जाधव, मुग्धा दिवाकर इत्यादी डॉक्टर व सप्तर्षी फाउंडेशनचे संस्थापक सचिव मनोजकुमार बोरसे, रुषाली बोरसे, सचिन सुसाले, जीवन साळवे, संस्थेच्या वतीने उपस्थित होते. संकल्प आणि प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली मुळे, सचिव श्रीकांत चव्हाण व सदस्य वरून सावरे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त होते.