#Lockdown : चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे काळेवाडीत 400 लोकांना अन्नदान

#Lockdown : चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे काळेवाडीत 400 लोकांना अन्नदान

पिंपरी, (लोकमराठी) : चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने काळेवाडी येथील तापकीर नगर झोपडपट्टीमधील 400 लोकांना आज (शुक्रवारी) अन्नदान करण्यात आहे.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून भारतात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपुर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे मोठे हाल होत आहेत. या मजुरांच्या जेवणाचे हाल होऊ नये, यासाठी चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेत काळेवाडीतील 400 गरजू लोकांना अन्नदान केले. त्यावेळी स्विकृत सदस्य विनोद तापकीर व सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे उपस्थित होते.

Subcribe | Share |Like

Actions

Selected media actions