वाकड, सांगवी, हिंजवडी विभागाचे नवनियुक्त पोलीस सहाय्यक आयुक्तपदी गणेश बिरादार

पिंपरी : सामाजिक शांतता व सुव्यवस्थेसाठी कुणाचीही तमा न बाळगता कारवाई होणार असे वाकड,सांगवी,हिंजवडी विभागाचे नवनियुक्त पोलिस सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांनी सांगवी पोलिस ठाण्याच्या सदिच्छा भेटीत व्यक्त केले.

भुरभुर पावसात-ओळख परेड-सांगवी पोलिस ठाणे सदिच्छा भेटीत रिमझिम पाऊस सुरू असताना बिरादार यांनी सदिच्छा भेट घेत ओळख व स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. यात स्थानिक पत्रकार व मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चाही केली.

यावेळी सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रंगनाथ उंडे, सांगवी पोलीस स्टेशन शांतता कमिटीचे संजय मराठे यांनी पुष्पगुच्छ देऊन सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड, गणेश बिरादार यांचे स्वागत केले. मनसेचे राजू सावळे, सुरेश सकट व देविदास बोऱ्हाडे, शशिकांत देवकांत पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Actions

Selected media actions