एएनआय : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. साध्वी प्रज्ञा यांनी मध्य प्रदेश मधील सीहोर येथे एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निशाणा साधताना त्यांच्याबद्दल अपशब्दाचा वापर केला.
प्रज्ञा म्हणाल्या की, ‘क्षत्रियला क्षत्रिय म्हटलं तर वाईट वाटत नाही. ब्राह्मणला ब्राह्मण म्हटलं तर वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटलं तर वाईट वाटत नाही. मात्र, शुद्राला शुद्र म्हटलं तर वाईट वाटत. कारण काय आहे? हे समजत नाही. या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
याबरोबरच त्यांनी बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांचावर निशाना साधताना म्हटले की, ‘ती तिलमिला झाली आहे, कारण की त्यांना समजल आहे की बंगालमध्ये आपले सरकार संपण्याच्या मार्गावर आहे. ही विधानसभा निवडणुक बीजेपीच जिंकणा व पश्चिम बंगालमध्ये हिंदू राज्य येणार।’