KALEWADI : धोकादायक चेंबरची रॉयल फाउंडेशनतर्फे दुरूस्त

KALEWADI : धोकादायक चेंबरची रॉयल फाउंडेशनतर्फे दुरूस्त

काळेवाडी : ज्योतिबानगरमधील ड्रेनेज चेंबरच्या भोवती तयार झालेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होत होती. तसेच दुर्गंधीही येत होती. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत रहदारीसही धोका निर्माण झाला होता. याची दखल घेत या धोकादायक चेंबरची रॉयल फाउंडेशनच्या पाठपुरावामुळे दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी रॉयल फाउंडेशनचे आभार मानले.

मातृछाया कॉलनी व साई श्रद्धा कॉलनीतील प्रत्येकी दोन आणि जयहिंद कॉलनीतील एक अशा पाच चेंबरच्या भोवती साधारणपणे एक ते दीड फुट खोल खड्डे तयार झाले होते. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले. त्यामध्ये एकाचा पाय मोडला तर एकाची चारचाकी गाडी अडकली होती. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात होते. स्थानिक नागरिकांनी रॉयल फाउंडेशनकडे ही समस्या मांडल्यानंतर रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रवि नांगरे यांनी तात्काळ महापालिकेला निवेदन देऊन पाठपुरावा करण्यास सुरूवात केली.

दहा दिवसांच्या पाठपुराव्यानंतर चेंबरची व्यवस्थित दुरूस्ती करण्यात आली. या कार्यामध्ये फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रकाश पठारे, खजिनदार गणेश नांगरे, कार्याध्यक्ष अजय काटे, आसिफ शेख, सोहेल मुलाणी, फाउंडेशनचे वरिष्ठ सल्लागार प्रकाश नांगरे, विजय ओव्हाळ, आनंद काटे, पंकज पाटोळे, सलीम शेख, नवनाथ कोकणे यांची मोलाची मदत झाली.

दरम्यान, फाउंडेशनचे अध्यक्ष रवि नांगरे हे नागरिकांच्या आरोग्यच्या बाबतीत गंभीर झाले असून याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास ते तातडीने हालचाली सुरू करतात. आगामी महापालिका निवडणुक ते लढवणार असून लोकांची सेवा करणेच त्यांचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. फाउंडेशनचे समाजकार्य पाहून अनेक तरूण फाउंडेशनला जोडले जात असून मोठ्या संख्येने नागरिकही फाउंडेशनला मदतीचा हात देण्यास तयार असल्याचे नांगरे यांनी सांगितले.