
पुणे : ‘ग्लोबल टीचर’२०२१ पुरस्कार मिळालेले पुणे जिल्ह्यातील दत्तात्रय लोखंडे हे पहिले प्राध्यापक ठरले आहेत. शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘ग्लोबल टीचर’२०२१ पुरस्कार भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक दत्तात्रय लोखंडे यांना घोषित करण्यात आला आहे. जगभरामधून शैक्षणिक क्षेत्रात मौल्यवान आणि अप्रतिम कामगिरी आणि समाजाप्रती विकास पैलूची विशिष्ट बांधिलकी केल्याबाबत त्यांना हे जागतिक नामांकन मिळाले आहे.
शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कारासाठी जागतिक शिक्षकांची नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. जगभरामधली ११० विविध देशामधले विजेत्यांच्या नामांकनमध्ये भारतीय विजेत्यामध्ये प्राध्यापक दत्तात्रय लोखंडे यांची निवड करण्यात आली ‘तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे,’ अशा शब्दांत निवड समितीने दत्तात्रय लोखंडे यांचा गौरव केला आहे.