गुणवंत कामगार पांडुरंग जगताप यांचे निधन

गुणवंत कामगार पांडुरंग जगताप यांचे निधन

पिंपरी : काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते किशोर जगताप यांचे वडील पांडुरंग बाबुराव जगताप (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. २९ सप्टेंबर ) निधन झाले.

दशक्रिया विधी रविवारी (दि. ०३ ऑक्टोबर) मुळ गावी निळूज-बेलसर (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे सकाळी साडेआठ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुन- नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांना ३० वर्ष गरवारे वालरोप कंपनीमध्ये काम केल्याबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला होता.