पिंपरी : ‘आता नागरिकांची एकच मागणी, रस्ता व नगरसेवक नवीन हवा. होय, मी रस्ता बोलतोय!’ अशा आशयाचे फ्लेक्स पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून नगरसेवकांवर यामधून रोष दिसून येत आहे.
त्यामुळे यावेळी रस्ते आणि नगरसेवक दोन्ही नवीन हवे आहेत, असा एकंदरीत सूर यामधून उमटत आहे. वाकड सारख्या परिसरात असे फ्लेक्स लागल्याने नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली असून राजकीय वातावरण देखील तापले आहे. हे फ्लेक्स कोणी लावले? का लावले? कोणाला उद्देशून लवळे? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात असला तरी यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकीत वाकड परिसरात जोरदार राजकीय आखाडा पहायला मिळणार असल्याचे यावरून दिसते.
प्रभाग रचना निश्चित होताच आता आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बिगुल वाजू लागले आहे. वाकड परिसरात कोणी अज्ञात व्यक्तीने होय. मी रस्ता बोलतोय… अशा मजकुराचे फ्लेक्स लावले आहेत. तो मोठा चर्चे चा विषय ठरत आहे. कारण वाकड परिसरात काही ठिकाणी रस्ते विकसित करतांना काहीजणांकडून अडवणूक होत असल्याची देखील चर्चा यापूर्वी रंगली होती. रस्ते अडवणुकीला नगरसेवकांनाच जबाबदार धरून हा फैल्क्स लावला असावा असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
बातमीसाठी संपर्क : ७०२८८२६२५५