चिंचवड : दिवाळी पाडवानिमित्त सर्व समाज बांधवांच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे श्री विठ्ठल बिरुदेव भाकणूक व परजेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. परिसरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर करीत बहुसंख्य भविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम प्रारंभ झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक चिंचवडे नगरमधील मुंजोबा देवस्थानाच्या प्रांगणात आली. त्यावेळी भाविकांनी उधळलेल्या भंडाऱ्याने परिसर सुवर्णमय झाला होता. त्याठिकाणी मानकऱ्यांना मान देत, मानाच्या तलवारीचे पुजन झाले.
कार्यक्रमाचे संयोजन वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगरमधील संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले होते. युवा नेते राहुल मदने, विनोद बरकडे, बिभीषण घोडके, दीपक वायकुळे, कृष्णा वायकुळे, बाप्पू वायकुळे, दादासाहेब कोपनर, संजय कोळेकर, राजाभाऊ वायकुळे, राजाभाऊ जाधव, गणेश बनगर, गणेश गोठणे, प्रवीण मदने, वसुदेव कोपनर, सोमनाथ खरात, गणेश वाघापुरे, रवी वायकुळे, जयसिंग कोपनर, धनंजय गाडे, बंडू मारकड, काका मारकड, नागनाथ वायकुळे, तानाजी कोपनर, अक्षय वायकुळे, अनिल कारंडे, विठ्ठल कारंडे, अक्षय रावसाहेब वायकुळे, दाजी वायकुळे, प्रभाकर कोळेकर, अंकुश खांडेकर, अनिल वायकुळे, समाधान सोलणकर, गणेश देवकते, अमोल वायकुळे, लखन वायकुळे, माऊली सरक, आपुल कोपनर, समाधान मारकड, देशमुख पाव्हण, सुनील कोळी,आश्रुबा वायकुळे, नारायण वाघमोडे, सचिन दादा चिंचवडे युथ फाउंडेशन व शेखर आण्णा चिंचवडे युथ फाउंडेशन तसेच सर्व वर्गणीदार यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडला.
राहुल मदने म्हणाले की, दिवाळी पाडवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. वाल्हेकरवाडीत या कार्यक्रमाचे सहावे वर्ष असून परिसरातील नागरिकांसह पाहुणे मंडळीचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असते. या दिवशी मोठ्या भक्तिभावाने देवाची पुजा केली जाते. तसेच प्रसाद म्हणून अंबिल वाटप केले जाते.