कु. प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवारातर्फे गरजूंना मिठाई व फटाके वाटप

कु. प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवारातर्फे गरजूंना मिठाई व फटाके वाटप

रहाटणी : दिवाळी हा रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. फटाके फोडून मोठ्या उल्हासात हा सण साजरा केला जातो. मात्र, समाजात अनेक कुटूंबांना हलाखीच्या परिस्थितीमुळे हा सण साजरा करता येत नाही. अशा काळेवाडी-रहाटणी परिसरातील गरजू मुलांना प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवाराच्या वतीने मिठाई, फराळ व फटाके वाटप करण्यात आले. त्यामुळे या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

कोरोना महामारीमुळे अनेकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. तर अनेक नागरिकांचे हातावरचे पोट असते. या अनुषंगाने आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून प्रसाद नखाते मित्र परिवाराच्या वतीने गरजू मुलांना शोधून त्यांना मिठाई, फराळ, फटाके देऊन या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला.

दरम्यान, प्रसाद नखाते मित्र परिवाराने कोरोना काळात समाजासाठी मोठे योगदान दिले. अनेक गरजूंना आवश्यक वस्तूंची मदत केली. तसेच असे समाजपयोगी उपक्रम प्रसाद नखाते मित्र परिवारातर्फे कायमच राबवले जातात.

याबाबत प्रसाद नखाते म्हणाले की, समाजात अनेक कुटूंबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. अशा लोकांना आपापल्या परीने मदत करणे गरजेचे आहे. दिवाळीच्या उत्सवात अशा गरजूंना काही मदत करून आपल्या आनंदात त्यांनाही सामावून घेऊ, या उद्देशाने हा उपक्रम राबविला. त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खुप समाधान वाटले.

कु. प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवारातर्फे गरजूंना मिठाई व फटाके वाटप