आत्माराम गोविंदराव हारे, पिंपळे गुरव
पिंपरी चिंचवड : निगडी येथील सावरकर सदन येथे नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या वतीने साहित्य आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे ९० टक्के सहभाग ज्येष्ठांचा होता, हे मला आवर्जून नमूद करताना आनंद वाटला. कारण, कोरोनामुळे प्रचंड ताणतणाव होता. तो या साहित्य संमेलनातून पुर्णपणे नाहीसा झाला. ज्येष्ठांच्या विविध कलागुणांचे दर्शन झाले. वय झालं असलं तरी उत्साह तरुणाईला लाजवणारा दिसून आला.
कविता म्हणजे एका विचारांने दुसऱ्या विचारांशी साधलेला संवाद आहे. प्रत्येक शब्द मानवतेचा आरसा असतो, याला तडा जाऊ नये, म्हणून कवी आपले विचार मांडत राहातो. हेच खरे वैशिष्ट्ये या काव्य मैफिलीतून दिसून आले. जगण्यातले बारकावे टिपणारा कवी समाजात सुख शांती निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रत्येक कवींच्या कवितांतून आढळून आले.
येऊ देत संकटांनी वाटेत अमुच्या
आम्ही घाबरत नाही अशा भेकडांना
आम्ही आमचा वारसा जपतो…
समाज कल्याणासाठी अशा प्रकारचा संदेश कवींच्या कवितांचा होता.” गझल असो की कविता दोघी एकाच आईच्या उदरातून जन्म घेतलेल्या मुली.” या माझ्या एका कवितेतल्या ओळी मला बळ पुरवतात, म्हणून मला गझलकार माझे भाऊ वाटतात.
जगण्याची कविता लिहिली पाहिजे | यासाठी मनमोकळी दाद दिली पाहिजे, आणि खरोखर येथील रसिकांनी प्रत्येकाच्या रचनेला दाद दिली. आशिर्वाद दिला म्हणूनच कविता सादर केल्याचा आनंद कवींच्या चेहऱ्यावर दिसून आला.
या कार्यक्रमाचे बारकाईने निरीक्षण कवी, मुक्तपत्रकार प्रदिप गांधलीकर हे त्यांची भुमिका निभावत असताना मला दिसून आले. मनापासून मला या माणसाचा अभिमान वाटतो. आणि वाटत राहील. प्रदिपजी, नुसत्या कविता लिहित नाहीत तर मराठी कवितेचा सन्मान करतात याचा मला विशेष आनंद वाटतो.
निगडी प्राधिकरणात रंगलेल्या काव्य कट्टा मैफीलीत जवळ्पास ३० शब्दप्रभू कवींनी आपला सहभाग घेतला. यात मलाही कविता सादर करता आली, याचा आनंद सुद्धा मला झाला. यात कवी आनंदराव मुळूक, संभाजी रणसिंग, प्रभु जाचक, चंद्रकांत धस, चंद्रकांत जोगदंड, अरुण कांबळे, प्रतिमा काळे, आत्माराम गोविंदराव हारे, सुभाष चव्हाण, कैलास भैरट, शोभाताई जोशी, अमर तिकोणे, श्नीखंडे, मिसेस श्नीखंडे आणि इतर कवींनी आपल्या शानदार रचना सादर करुन उपस्थितांची वाहवा वाहवा मिळवली, नंतर प्रत्येक कवीला गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल नगरसेविका शर्मिलाताई बाबर व आनंदराव मुळूक सहीत त्यांच्या इतर कार्यकर्त्यांचेही मनापासून आभार.