दिघीत वाघबारस उत्साहात साजरी

दिघीत वाघबारस उत्साहात साजरी

दिघी : येथील आदिवासी समाजाचे दैवत असलेल्या वाघोबा मंदिरात वाघबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाघोबाच्या मूर्तीचे पुजन वसंत रेंगडे आणि अमोल देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच खिरीचा नेवैद्य दाखवून नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

वाघबारसच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मा. नगरसेविका आशा सुपे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश आल्हाट, सचिन दुबळे, बाळासाहेब सुपे, सिता किरवे, विकास गाढवे, निवुर्ती लांडे, आनिल भोजने, संजय बांबळे, रामदास गवारी, रामदास भांगरे, कुसूम गभाले, मनिषा जढरयमुना उंडे, सुरेश वडेकर आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.

Actions

Selected media actions