पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांना माळी महासंघ व माध्यमिक शिक्षक संघ पिपंरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री-जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी (ता. २०) हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य शोभा देवकाते या मागील २५ वर्ष निःस्वार्थ भावनेने करत आहेत. अहोरात्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ध्यास, त्यांना सुजान अन सुसंस्कृत नागरिक बनविण्याचे स्वप्न त्यांनी पहिले व ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न केले. आज त्यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रगती करत आहे. विद्यार्थ्यांना घडवीत आहे. त्यांच्याकडे असलेला स्पष्टवक्तेपणा प्रसंगी रागावून दुसऱ्याच क्षणी पाठीवर हात ठेवून विद्यार्थ्यांला त्याची चूक दाखविण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी सर्व विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये एक आदर्श, कर्तव्य दक्ष मुख्याध्यापिका म्हणून प्रिय आहेत.
त्यांच्या २५ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक खाणकामगाराच्या शाळाबाह्य विध्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहमध्ये आणले, विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन प्रकल्प, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, वृक्षाना दिवाळी फराळ असे विविध उपक्रम राबविले. ज्ञानदानाच्या पवित्र कार्य बरोबरच त्या दर वर्षी आळंदी-पंढरपूरच्या वारकऱ्यांना अन्नदानाचे पवित्र कार्य करतात. त्यांच्या कारकिर्दीत विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार, उपक्रमशील मुख्याध्यापिका पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते, संस्थेचे सचिव डॉ. तुषार देवकाते,यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ, यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मिडीयम स्कुल, यशस्वी बालक मंदिर, सर्व शिक्षक, विदयार्थी, पालक यांच्या तर्फे शोभा देवकाते यांचे अभिनंदन करण्यात आले.