बालाजीनगरमध्ये ड्रेनेज लाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बालाजीनगरमध्ये ड्रेनेज लाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

भोसरी : बालाजीनगरमध्ये ड्रेनेज लाईन सतत तुंबत असल्याने घाण पाणी नागरिकांच्या घरात जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वेल्फेअर पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत वारंवार महापालिकेकडे तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सांडपाणी जाण्यासाठी सुद्धा नाली नाही आणि त्यामध्ये जर ड्रेनेजचे घाण पाणी तुंबल्यावर थेट लोकांच्या स्वयंपाकघरातपर्यंत जात आहे. प्रशासनाने योग्य नियोजनबद्ध काम केलेले नाही, लहान पाईपलाईन टाकलेली असल्यामुळे वारंवार ही अवस्था होत आहे. जर पालिका याकडे दुर्लक्ष करत असेल तर वेल्फेअर पार्टी तर्फे हा मैला महानगरपालिकेत टाकला जाईल, याची जबाबदारी महापालिकेने स्विकारावी. असा इशारा वेल्फेअर पार्टीने दिला आहे.

Actions

Selected media actions