राष्ट्रवादी पक्षाच्या मोर्चांमुळे भाजपच्या मनात धडकी – युवक शहराध्यक्ष इम्रान शेख

राष्ट्रवादी पक्षाच्या मोर्चांमुळे भाजपच्या मनात धडकी - युवक शहराध्यक्ष इम्रान शेख

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात काढलेल्या मोर्चांमुळे भाजपच्या मनात धडकी भरली आहे. त्यांच्या पायाखालची माती सरकली असून घाबरलेल्या या भाजपचे पतन व्हायला सुरूवात झाली आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी येथे व्यक्त केले.

भाजप सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी (ता. २) संत तुकाराम नगर येथील पेट्रोल पंपावर निषेध सभा राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित केली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी (३०) राष्ट्रवादी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना शेख बोलत होते.

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे व सुरज चव्हाण, खासदार अमोल कोल्हे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम नगर येथील एचपी पेट्रोल पंपजवळून हे निषेध आंदोलन आचार्य अत्रे सभागृहात पोहचणार आहे. त्याठिकाणी निषेध सभा पार पडणार आहे. असे शेख यांनी सांगितले.

त्यावेळी युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी व निलेश निकाळजे, उपाध्यक्ष योगेश मोरे, मंगेश बजबळकर, हेमंत बडदे, आयुष निंबाळकर, सचिन मोकाशे, गणेश कोणमाने, अ‍ॅड. राकेश गुरव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्याने उपस्थित होते.

इम्रान शेख म्हणाले की, भाजप पक्ष हा आपण लहानपणी पहात असलेल्या शक्तिमान मालिकेतील क्रुर तम्राश किलबिश प्रमाणे आहे. तो अंधेरा कायम रहेगा असा म्हणायचा. या तम्राश किलबिशरूपी भ्रष्टाचारी भाजपला हरवायाचे असेल तर युवकांना शक्तिमान व गंगाधर होणे गरजेचे आहे. असे आवाहन यावेळी शेख यांनी केले.

सध्या राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात मोहिम उघडली असून मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता, तसेच होळीला भ्रष्टाचारी भाजपची होळी केली. त्याचबरोबर युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गडकिल्ले स्वच्छता अभियान राबविले आहेत. सध्या युवकांचे संघटन वाढले असून लवकरच प्रभागनिहाय नियुक्त्या करण्यात येणार आहेत. असे युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश मोरे यांनी केले. सुत्रसंचालन सनी डहाळे यांनी केले तर शादाफ खान यांनी आभार प्रदर्शन केले.