- युनिव्हर्सल शोतोकन कराटे दो असोसिएशन व अरुण चाबुकस्वार स्पोर्ट फाउंडेशनतर्फे केले होते आयोजन
रहाटणी : युनिव्हर्सल शोतोकन कराटे दो असोसिएशन व अरुण चाबुकस्वार स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कराटे कुमिट चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धा विमल गार्डन रहाटणी येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धचे उद्घाटन संजय पवार (7th ब्लॅक बेल्ट उस्का), राजेश सोळंके (4th डॅन ब्लॅक बेल्ट उस्का), अंकुश तिकोने (4th डॅन ब्लॅक बेल्ट उस्का) व न्यू सिटी प्राईड स्कूलचे संस्थापक व अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रहाटणी, पिंपळे सौदागर येथील राॅयल इम्पिरीअो, रॉयल रहाटगी, पार्क रॉयल, ऑरेंज काउंटी, फ्लोरा सोसायटी, हरीत शिल्प, दोरका साई हेरिटेज, वर्धमान अंगण, ऐरोना 29 अशा विविध सोसायट्यातील १८ वर्षाखालील वयोगट चार ते सात, सात ते बारा, बारा ते सोळा, सोळा ते अठरा या वयोगटातील ५५० मुला-मुलींनी यामध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवला, व विजेत्यांनी पारितोषक जिंकले.
“कोरोनाचे थैमान गेल्या दोन अडीच वर्षापासून सुरू होते, त्यामुळे सर्व शाळा कॉलेज बंद होते ,त्यामुळे सर्व प्रकारच्या मैदानी खेळापासून मुले – मुली वंचित होते बऱ्याच वर्षानंतर मुलांना अशा कराटे स्पर्धेचा लाभ घेता आला. मुलांच्या चेहऱ्यावर उस्फूर्त प्रतिसाद दिसत होता”. असे उद्गार महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी काढले.
त्या-त्या वयोगटातील सुवर्ण, रोैप्य, ब्राँझ हे त्या विजेत्या स्पर्धकांना व तसेच सोसायटीयातील ग्रुपला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे व चंद्रकांत नखाते, तसेच माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, देवाप्पा नखाते, काळूराम कवितके, पार्क रॉयल सेक्रेटरी उदय साबडे, राहुल भातकुले, युवराज प्रगणे, वेंकटेश जाधव बिल्डर, मिरचंदानी पाम सोसायटीचे चेअरमन अनुभव लाल, रॉयल इम्पेरिअो सोसायटीचे सेक्रेटरी अभिषेक पद्मावर, सनशाईन सोसायटीचे सेक्रेटरी प्रवीण बालन, फाईव्ह गार्डन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीकांत सारडा व हेमंत भट, स्वराज्य नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुनील कुंजीर, रामभाऊ खंडागळे किरण लोंढे, प्रदीप पाटील (2th डॅन ब्लॅक बेल्ट), देशराज नागर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास मोहिते यांनी केले.