औंध : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कॅन्टीन व्हावी. यासाठी रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या सोबत सतत तीन वर्षे रयत विद्यार्थी परिषद पाठपुरावा करत होते. त्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले असून महाविद्यालयात कॅन्टीन सुरू करण्यात आली आहे.
महाविद्यालयाच्या कॅन्टीन उदघाटन प्रसंगी रयत शिक्षण संस्था सातारा पश्चिम विभागाचे अधिकारी पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, उपप्रचार्य रमेश रणदिवे, औंध कुस्ती संघाचे विकास रानवडे, अभिराज भडकवाड, केदार कदम, मोहसीन शेख, महाविद्यालय क्रीडा व शिस्त समितीचे अध्यक्ष बी. एस. पाटील, रयत विध्यार्थी परिषदेचे मुख्य संघटक ऋषिकेश कानवटे व सचिव राजू काळे, महाविद्यालयामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, औंध परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मनीष रानवडे हे महाविद्यालयीन कॅन्टीनचे संचालक म्हणून काम पाहणार आहेत. त्यानिमित्त मनीष यांनी पुढील वाटचालीसाठी रयत विध्यार्थी परिषदेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.