कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचा १२०० जणांना लाभ

कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचा १२०० जणांना लाभ

पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त रहाटणी येथे आयोजित केलेल्या मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचा सुमारे १२०० नागरिकांनी लाभ घेतला. कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मधील नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात मधुमेह, थायरॉइड, किडनीचे विकार, लिव्हरचे विकार, हृदय विकार, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांवर प्रभावी ठरणाऱ्या ॲक्युप्रेशर थेरपी उपचार पद्धतीचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक कैलास थोपटे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ता कारभारी, प्रकाश गायकवाड, सखाराम रानवडे, माणिक थोरात, संतोष परसे, रघुनाथ जठार, विजय निकम, नंदू पाटील, विकास थोपटे, प्रदीप चौधरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष कुणाल थोपटे यांनी सर्वांचे आभार मानले.