पिंपरी : गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा २०२१ मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील आदित्य मल्लिकार्जुन बुक्की याने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. या स्पर्धेचे आयोजन नॅशनल किकबॉक्सिंग असोसिएशन एन.जी (वाको इंडिया) यांच्या मान्यतेने गोवा किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये देशभरातून सुमारे ४५० पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला. महाराष्ट्र संघटनेच्या संघाद्वारे आदित्य मल्लिकार्जुन बुक्की याने ७४ किलो सिनिअर पुरूष गटामध्ये पाँईट फाईट आणि किक लाईट या दोन क्रीडा प्रकारात भाग घेऊन सुवर्ण पदकांची कमाई केली. या स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम, आसाम द्वितीय व ओडिशा तृतीय सांघिक विजेतेपदाचे मानकरी ठरले.
आदित्य बुक्की यांना त्यांचे प्रशिक्षक उमरकासिम तांबोळी व पिंपरी चिंचवड अध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेमध्ये अशफाख तांबोळी यांनी रेफ्री म्हणून उत्तम कामगिरी केली.