चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान अभ्यासपूर्ण लिहिले म्हणून देश सुरक्षित आहे व पुढेही राहणार आहे. त्यामुळे आपण लिहिणे, वाचणे गरजेचे असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याला पुस्तक रूपाने बघणं आवश्यक आहे. नाच गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती होणार नाही म्हणून बाबासाहेबांना डोक्यात घेणे गरजेचे आहे. अशा आशयांचे मनोगत विविध मान्यवरांनी चिंचवडगाव येथे भिम महोत्सवात व्यक्त केले.
प्रबुद्ध संघाच्या वतीने चिंचवडगाव भिम महोत्सव २०२२ उत्साहात साजरा करण्यात आला. गाडगेबाबा चौक केशवनगर येथे सकाळी ८ वाजता प्रबुद्ध संघाचे अध्यक्ष किशोर सोनवणे व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते पंचशील झेंडा रोहन करण्यात आला.
यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमोद साळवी, चंद्रकांत लोंढे, अल्पना गोडबोले, अर्चना गावडे, निशांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर कडलग, संजय कांबळे, दिंगबर घोडके, दिलीप गोडबोले, प्रतिमा साळवी, अणुराधा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव किशन बलखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजू वासनिक यांनी केले.