पालघर (लोकमराठी) : शेतकऱ्यांच्या मोगरा पिकाची योग्य साठवणुक व्यवस्था कमी क्षेत्रात निर्माण करुन त्या पीकाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी अनुसुचित जमातीच्या शेतकरी वर्गासाठी मोगरा शितगृह युनीटचे वाटप करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी किंमत मिळवुन देण्यासाठी मागील 5ते10वर्षामध्ये जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील मोगरा लागवड योजनेचा लाभ मिळालेल्या अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या महिला बचत गटाला /शेतकरी उत्पादक गट तयार असल्यास किंवा उत्पादक गट तयार करुन त्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275(1) योजने अंतर्गत मोगरा शितगृह युनीट पुरवठा करण्यात येणार असुन सदर युनीट वापरासंबंधीत सर्व माहिती तज्ञ मार्गदर्शकांकडुन देण्यात येणार आहे. सदर युनिटच्या दुरुस्ती देखभालीची 18 महीण्यापर्यंतची वॉरंटी असेल सदर योजनेसाठी दि.09.12.2019 ते दि.18.12.2019 पर्यंत अर्ज सादर करावे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी पुढीलप्रमाणे
प्रकल्प कार्यालयाच्या नावे अर्ज बचतगटच्या अध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षरीने करावा, बचतगट एकत्रित व्यवसाय करण्याबाबतचे/योजना राबविण्याबाबतचे सर्व बचतगटांच्या सदस्यांचे स्वाक्षरीचे पत्र, बचगटाचा योजने संदर्भात ग्रामपंचयातीचा ठराव, बचतगटाचा योजने संदर्भात ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला,
बचतगटाचे नोंदणी प्रमाणपत्र, बचतगटातील सदस्यांनी या कार्यालयामार्फत मोगरा लागवड योजनेचा लाभ घेतल्याचा दस्ताऐवज, योजना ज्या ठिकाणी सुरु करणार आहे त्याजागेचा /जमीनीचा 7/12 , तसेच युनीटसाठी पुरेसा विद्युतपुरवठा असल्याबाबतचे प्रमाणपत्र असावे असे जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत साळवे यांनी कळविले आहे.