हुतात्म्यांचे घातले श्राद्ध! जेवला मुस्लिम फकीर! गुंड राजकारण्यांच्या वतीने मागितली क्षमा

हुतात्म्यांचे घातले श्राद्ध! जेवला मुस्लिम फकीर! गुंड राजकारण्यांच्या वतीने मागितली क्षमा

पिंपरी : आज सर्व पित्री आमवश्या. पूर्वजांना आठवण करण्याचा आणि काही चुकले असल्यास क्षमा मागण्याचा दिवस. देश हा जर कुटुंब मानला तर सर्व हुतात्मा स्वतंत्र सैनिक आपले पूर्वज. मग त्या हुतात्मामधे सर्व जाती धर्माचे लोक होते. देश कुटुंब मानून निसर्ग मित्र डॉ. संदीप बाहेती यांनी हुतात्म्यांचे सुद्धा श्राद्ध घातले आणि गुंडगिरी करणाऱ्या, गुंडांना निवडणुकीचे तिकीट देणाऱ्या, गुंड असणाऱ्या, सर्वच्या सर्व राजकारण्यांच्या वतीने क्षमा मागितली.

डॉ संदीप बाहेती म्हणाले की, “दरवेळी मी गाडी काढतो आणि रस्त्यावर कुणी गरजू अथवा कुणी भुकेला भेटल्यावर, त्यास घरी अतिथी म्हणून जेवण्यास घेवून येतो. आज लवकर कुणी दिसेना. बराच शोध घेतल्यानंतर एक मुस्लिम फकीर मला दिसले. मी त्यांना जरा चाचपडत विचारले, श्रद्धाच जेवणार का? फकीर हो म्हणाले. इकडे त्या फकीर व्यक्तीने घास घेतला आणि तिकडे पिंड येवं श्राद्धाच्या जेवणाला कावळा शिवला. आज मुस्लिम फकीर अतिथी म्हणून भेटणे आणि त्यांनी घास घेतल्यावर कावळ्याने घास घेणे, हा योगायोग नक्कीच नव्हता.”

हुतात्म्यांचे घातले श्राद्ध! जेवला मुस्लिम फकीर! गुंड राजकारण्यांच्या वतीने मागितली क्षमा