
Apple iPhone 16e launched In India :जगातील लोकप्रिय कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपल कंपनीने आयफोन १६ ई (iPhone 16e) भारतात लाँच केला आहे. तसेच खास गोष्ट म्हणजे आयफोन स्वस्तात मिळावा अशी ग्राहकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण आयफोन १६ सीरिजमधील iPhone 16e हा फोन सगळ्यात स्वस्त असणार आहे. तर भारतात लाँच झालेल्या ॲपलच्या नवीन फोनची किंमत, फीचर्स आणि तुम्ही हा कधीपासून ऑर्डर करू शकणार आहात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
- डिझाइन आणि डिस्प्ले:
iPhone 16e मध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा नॉच iPhone 14 सारखा आहे. हा डिस्प्ले 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. iPhone SE सीरिजमध्ये दिसणाऱ्या म्यूट स्विचऐवजी एक ॲक्शन बटण देण्यात आले आहे. ॲक्शन बटणद्वारे युजर्स कॅमेरा किंवा डू नॉट डिस्टर्ब मोड ॲक्टिव्ह करू शकतात. याव्यतिरिक्त फोनमध्ये यूएसबी-सी (USB-C) पोर्टसुद्धा असणार आहे. डिस्प्लेवर सिरॅमिक शील्ड प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
- प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर:
iPhone 16e मध्ये 6-कोर ए18 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन आयओएस 18 वर चालतो. नवीन आयफोन 16ई आयफोन 15 प्रो (2023) आणि आयफोन 16 सिरीज सारख्या अॅपल इंटेलिजेंस वैशिष्ट्यांना सपोर्ट करतो. यात 48 मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा आणि प्रोग्रामेबल अॅक्शन बटण आहे. A18 चिपमध्ये 6 कोर CPU आहे, जो ॲपलच्या A13 बायोनिक चिपपेक्षा ८० टक्क्यांपर्यंत वेगवान आहे, जो आयफोन ११ मध्ये देण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये 4 कोर GPU आणि 16 कोर न्यूरल इंजिनदेखील आहे, जे मशीन लर्निंग कार्ये अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ॲपलच्या मते, न्यूरल इंजिन एआय मॉडेल्सवर A13 पेक्षा सहापट वेगाने काम करू शकते. iPhone 16e ॲपल इंटेलिजन्स (Apple Intelligence) लादेखील सपोर्ट करतो. आयफोनमध्ये एआय फीचर्स जसे की, Genmoji, काही लेखन साधने आणि चॅटजीपीटी ChatGPT आदी टूल्सचा समावेश असणार आहे.
- कॅमेरा:
फोटोग्राफीसाठी iPhone 16e च्या मागे एकच कॅमेरा देण्यात आला आहे, जो 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा सिस्टमला 2x टेलिफोटो झूम पर्याय दिला आहे, ज्यामुळे युजर्सना मूळ फोटोची क्वाॅलिटी राखून अगदी फोटो झूम करून सहज काढता येऊ शकतो.
- किंमत काय असेल?
iPhone 16e च्या बेस १२८ जीबी व्हेरियंटची किंमत यूएसएमध्ये $599 म्हणजेच अंदाजे ४९ हजार ५०० रुपयांपासून सुरू होते, तर भारतात iPhone 16e मॉडेलची किंमत ५९ हजार ९०० रुपये असणार आहे. iPhone 16e च्या २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे, तर ५१२ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ८९,९०० रुपये आहे.
- इतर वैशिष्ट्ये:
फोनमध्ये स्टीरियो स्पिकरचा समावेश करण्यात आला आहे. फोन 2022 मध्ये लाँच झालेल्या आयफोन एसई 3 चे अपग्रेडेड मॉडेल असेल. कंपनीने नवीन आयफोनमध्ये आयफोन 16 चे अनेक फीचर्स दिले आहेत.
- उपलब्धता:
iPhone 16e साठीची प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 28 फेब्रुवारीपासून डिलिव्हरी देण्यास सुरुवात होईल.