राष्ट्रवादी अर्बन सेलच्या महिला शहराध्यक्षा पदी मनिषा गटकळ यांची नियुक्ती

राष्ट्रवादी अर्बन सेलच्या महिला शहराध्यक्षा पदी मनिषा गटकळ यांची नियुक्ती

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या (जिल्हा) वतीने पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज (ता. ३ जून) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी जाहिर करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते मनिषा किसन गटकळ यांची अर्बन सेलच्या महिला शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आजपर्यंत गटकळ यांनी वार्ड अध्यक्षा, प्रभागाध्यक्षा, शहर उपाध्यक्षा, तसेच भोसरी विधानसभेच्या दोन टर्म महिलाध्यक्षा, अश्या अनेक महत्त्वाच्या पदांवर आपली कारकीर्द यशस्वीपणे गाजवली आहे. शहर पातळीवर राष्ट्रवादीचे एक एकनिष्ठ आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते.

याबाबत मनिषा गटकळ म्हणाल्या की, “या ही पदावर दर्जेदार काम करुण आदरणीय पवार साहेब, अजितदादा, सुप्रिया ताई आणि अर्बन सेलच्या, प्रदेशाध्यक्षा आदरणीय खासदार वंदना चव्हाण, तसेच शहराध्यक्ष माननीय अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातिल प्रत्येक घटकांपर्यंत पोहचुन, प्रामाणिक कार्य करत असताना, राष्ट्रवादी अर्बन सेलच्या माध्यमातून, उत्कृष्ट काम करेल.” असा विश्वास व्यक्त करत अजित पवार आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना त्यांच्नी ग्वाही दिली.