सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर

सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर

पिंपरी, ता. ३ : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांना प्रभावित होऊन काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जगताप हे राष्ट्रवादीत दाखल होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३२ मधून एससी प्रवर्गातून जगताप रिंगणात असून काळेवाडीत प्रथमच अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडल्याने बाबासाहेब जगताप यांच्या रूपाने सामाजिक जाणीव व मागासवर्गीयांसाठी झटणार चेहरा मिळाल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज शहरात दौरा होता. त्यावेळी शहरातील विविध कामांचे उद्धाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याच दौऱ्यादरम्यान दुपारी श्री. पवार काळेवाडीत आले होते. त्यावेळी समस्थ बहुजन समाजाच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संगमरवरी मुर्ती भेट देण्यात आली. त्या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, चिंचवड विधानसभा अध्यक्ष व माजी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे व मयुर कलाटे, उद्योजक संदीप काटे, बाबासाहेब जगताप, राकेश नखाते, ख्रिश्चन नेते प्रकाश पठारे, संदीप जाधव, विलास पवार, सनी मकवाना, प्रवीण कदम, सिताराम जगताप, नेताजी नखाते, शशिकांत जाधव, प्रकाश घोडके, मनोहर आप्पा जाधव, अरुण मैराळे, चित्रा जगताप, बीएसपी शहराध्यक्षा विद्या जाधव,जयश्री धनगर, रेश्मा कदम, देवीका जगताप, सिस्टर आरती पठारे, अर्चना कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष प्रफुल्ला शैलेंद्र मोत्तलींग, शहर मुख्य संघटिका मीरा दिगंबर कदम, संगीता कोकणे, कोमल दिनेश नढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, बाबासाहेब जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध कार्यक्रमात हजेरी पहावयास मिळत असून राष्ट्रवादीच्या शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी होताना दिसत आहेत. त्यामुळे जगताप यांचा जवळजवळ राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात आहे.