थरमॅक्स कंपनीत कामगारांना २१००० रूपयांची वेतनवाढ; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

थरमॅक्स कंपनीत कामगारांना २१००० रूपयांची वेतनवाढ; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

चिंचवड : थरमॅक्स लिमिटेड (Thermax Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि थरमॅक्स कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. १ मे २०२२ ते ३० एप्रिल २०२५ असा तीन वर्षांसाठी हा करार असणार त्यामधे १४,१०० रूपयांची डायरेक्ट वाढ, अधिक १८०० रूपये इन्सेंटिव्ह असे १५,९०० रूपयांची वेतन वाढ करण्यात आली आहे. या कराराचा लाभ चिंचवड फॅक्टरी मधील सर्व कायम कामगारांना होणार असून त्यामुळे कामगारांचे किमान वेतन वाढ १२,५२४ व कमाल वेतन वाढ २१,०८५ एवढी झाली आहे.

सेवाजेष्ठता पारितोषिक व सन्मानचिन्ह :

 • ५ वर्षासाठी २०००
 • १० वर्षासाठी ४०००
 • १५ वर्षासाठी ६०००
 • २० वर्षासाठी ८०००
 • २५ वर्षासाठी १५०००
 • शैक्षणिक कर्ज : कामगारांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी ५ लाख रूपये शैक्षणिक कर्ज देण्यात येईल.
 • सणावाराची उचल : पूर्वीच्या १४००० मध्ये ६००० रूपयांची वाढ करून २०,००० करण्यात आले.
 • शॉर्ट लिव्ह : महिन्यातून दोन वेळा वर्षातून चोवीस वेळा उपभोगता येईल.
 • सर्व कामगारांना वर्षातून एकदा थरमॅक्स लोगोचे एक टी शर्ट व एक कॅप देण्यात येईल.
 • स्नेहसंमेलन : वर्षातून एकदा सर्व कामगार व कुटुंबीयांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात येईल.
 • दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी असलेल्या इन्क्रिमेंट मध्ये सरसकट ५०% वाढ करण्याचे मान्य करण्यात आले.

या करारावर व्यवस्थापनाच्या वतीने ई.आर. हेड सुहास गर्दे, फॅक्टरी मॅनेजर मदन कुलकर्णी, मॅन्युफॅक्चरी डिव्हिजन हेड किरण शाळिग्राम, प्रोडक्शन हेड व्यंकटरमण एस, मॅनेजर इ.आर विजय सियाक, असिस्टंट मॅनेजर इ.आर राहुल चौगुले, मॅन्युफॅक्चरी मॅनेजर आनंदा तळेकर तसेच युनियनच्या वतीने अध्यक्ष किशोर पाराजी सोमवंशी, जनरल सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र पवार, कार्याध्यक्ष संजय जयसिंग देशमुख, उपाध्यक्ष दत्तात्रय शिवाजी भुसे, उपाध्यक्ष सुशील महादेव मिरगल, जॉ. सेक्रेटरी विश्वास शंकर पोळ, जॉ. सेक्रेटरी प्रदीप दत्तात्रय तरटे, सेक्रेटरी मिलिंद शंकराव बायस्कर, खजिनदार संदीप शिवाजी ठाकूर, सदस्य सुधाकर प्रल्हाद गोसावी, गोरख विश्वनाथ बोबडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

थरमॅक्स कंपनीत कामगारांना २१००० रूपयांची वेतनवाढ; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

या करारात जसमित भाटिया साहेब (चिफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर), हेमंत जोशी (एस.बी.यु हेड) व विपिन उपाध्याय (सेफ्टी हेड) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, थरमॅक्स कंपनी ही जगातील बॉयलर क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून भारतातील चिंचवड येथे कंपनीची मूळ स्थापना १९६६ साली झाली. सदर वेतन करार हा औद्योगिक मंदीच्या काळामधील असून पुणे औद्योगिक क्षेत्रातील उत्कृष्ट वेतन करार आहे.