राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शकुंतला सावंत यांची नियुक्ती

राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शकुंतला सावंत यांची नियुक्ती

हडपसर (प्रतिनिधी) : केमिस्ट्री विभागाच्या प्रोफेसर डॉ. शकुंतला सावंत यांची राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध (ता. खटाव जि. सातारा) येथे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल एस एम जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. शकुंतला सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, आय. क्यु. ए. सी. चे प्रमुख डॉ. किशोर काकडे, डॉ. गजानन वाघ, डॉ. एस. पी. खुंठे, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. ग्रंथपाल शोभा कोरडे, अधीक्षक आर. डी. लोखंडे आदि प्राध्यापक व सेवक वर्ग उपस्थित होते.