पिंपरी : कुडो वर्ल्ड कप जपान २०२२ साठी निवड झालेल्या गार्गी अरविंद मोरे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधिक्षक सीमा अडनाईक, कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारती चव्हाण प्रांत पोलीस मित्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी, ग्लोबल इंडिया फौंडेशन उपसंचालिका ऍड. पियाली घोष, पुणे जिल्हा कुडो संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे मान्यवर उपस्थित होते.