महिला दिनानिमित्त आशा वर्कर व महिला सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार

महिला दिनानिमित्त आशा वर्कर व महिला सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार

पिंपरी : जागतिक महिला दिनानिमित्त मानवता हिताय सोशल फाउंडेशन व सचिन गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने साडी भेट करून महिला सफाई कर्मचारी व आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला. खराळवाडी-गांधीनगर येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोनाली हिंगे, मुमताज शेख, वर्षा जगताप, अश्विनी कांबळे, रुक्मिणी कांबळे, माधवी शिंदे, ब्रिगेडीयर बच्चन सिंग, गणेश आहेर व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सचिन गायकवाड, मानवता हितायचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाली, निलेश लोंढे, कार्याध्यक्ष नितुल पवार, अमोल बेंद्रे, विजय शिंगाडे व संपूर्ण मानवता हिताय टीम यांच्या वतीने करण्यात आले.

महिला दिनानिमित्त आशा वर्कर व महिला सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार