
लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड : कोरोना व्हायरसच्या पाश्वभुमी भाजपच्या नगरसेविका सुनिता हेमंत तापकीर व चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर यांनी स्वखर्चाने प्रभाग क्रमांक २७ मधील तापकीरनगर परिसरात औषध फवारणी केली.
कोरोना (#COVID19) व्हायरसने जगात थैमान घातले असून लाखो नागरिकांना त्याची बाधा झाली आहे. तर हजारो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. भारतातही कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक रहावे व आरोग्य स्वच्छ ठेवावे, आम्ही आपल्यासोबत आहोत. असा नागरिकांना दिलासा देत राज तापकीर यांनी स्वतः पंपाने औषध फवारणी केली.
तापकीरनगरमधील त्रिशक्ति काॅलनी, परिस काॅलनी १,२ व ३, त्याचबरोबर श्रीराम काॅलनी, स्वस्तिक काॅलनी, मोरया काॅलनी १ व २, तुळजाभवानी काॅलनी, साईमल्हार काॅलनी, तापकीर चौक रोड व विविध सोसायटीमध्ये राज तापकीर यांनी प्रत्यक्ष जाऊन औषध फवारणी केली. तसेच उर्वरीत भागातही फवारणी करण्यात येणार असल्याचे तापकीर यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी घरीच थांबून कोरोनाचा प्रतिकार करावा, संकट कोणतेही असो, आम्ही मागे हटणार नाही. असे नागरिकांना आश्वस्त करत, नगरसेविका सुनिता तापकीर व राज तापकीर यांनी 9580272727 व 9175272727 हे हेल्पलाईन नंबर नागरिकांना दिले आहेत.