मुंबई : आमदार कालिदास कोळंबकर यांनी जनता दरबाराचा माध्यमातून जनतेशी संवाद साधला. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखालील विजय नगर व परिसरातील नागरिकांसाठी जी व उत्तर आरोग्य विभागाच्या अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर, औषधो उपचार तसेच कोविड-19 टेस्ट सुविधा करण्यात आली.
नागरी सुविधे अंतर्गत जेष्ठ नागरिक यांना कार्ड, पॅन-कार्ड, आधारकार्ड सुविधा उपलब्ध करण्यात आले, तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत झाडे लावणे, समाजातील विकलांगांना तीनचाकी सायकलचे वाटप ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. तसेच जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद करून समस्याचे निवारण सुद्धा करण्यात आले.
त्यावेळी कार्यकर्ते बाबूभाई भवानजी, वसंत जाधव, चारुलता हंबीर, डॉ. अंकुश शेठ, मयुरी तारी, महेश धानमेले, एकनाथ संगम, शिवाजी खंडागळे, प्रकाश तरळ, उलका ठाकूर, स्नेहा जोशी, सौ. हर्षल कांबळे, मनीषा आमडसकर, प्रविण सुर्वे, भास्कर दुसा, रवी एनगुड्डू, गौरीशंकर पुरोहित, संदीप तीवरेकर, संतोष शिंदे, शैलेश यादव, डॉमनिक, विष्णू सोनवणे, दीपक ढवण व यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर कार्यकमाचे आयोजन जितेंद्र विष्णू कांबळे (उपाध्यक्ष- वडाळा विधानसभा) व जितेंद्र गुप्ता (उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली झाले.