मुंबई : राजकीय पक्ष राजकारण करतात एकमेकांवर चिखलफेक करतात. आणि आपल्या सोईने आणि कामाच्या, हिताच्याच बातम्या याव्यात. असे प्रत्येकाला वाटत असते. बातमीदारी करताना अपडेट माहिती पोहोचवताना जी मेहनत आमच्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना घ्यावी लागते, उनपावसाची पर्वा न करता धावावे लागते याचे महत्व जनता समजू शकते. स्वार्थी आंधळे लोकं हे समजू शकतंच नाहीत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कस्पटासमान मानणारे लोकच त्यांचा अपमान करतात हे प्रखर जळजळीत वास्तव आहे.
चित्रपटातील कलाकार साँफ्ट टारगेट असतात, तिथे आपण कोणावरही हल्ला केला तर गपगुमान सहन करतात असा आपला गोड गैरसमज असल्याने माध्यमांवर हीन दर्जाची चिखलफेक करताहेत! लोकशाहीच्या मुख्य आधारस्तंभाला कुत्रा म्हणून सोशल मिडियात वायरल करणारे हे जे कोणी लोक आहेत त्यांनी कोणताही विलंब न करता आपण केलेल्या महाप्रतापाबद्दल प्रसार माध्यमांची जाहीर माफी मागावी. अन्यथा आपल्या विरोधात संघर्ष अटळ आहे. असा इशारा एनयुजे महाराष्ट्र अध्यक्षा शीतल करदेकर यांनी दिला आहे.
दरम्यान, संघटनेच्या नावाचा वापर करून माध्यमांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिजित आपटे यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. असा खुलासा भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष विजय सरोज यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
तर अभिजित आपटे या व्यक्तीनेही सोशल मिडीयावर त्याच्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे.