पुणे : खडकी रेंजहिल येथील गुरूद्वारासमोर रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या गाईला महाविद्यालयीन तरूण-तरूणी, नागरिक व बजरंग दल, आरएसएसच्या स्वयंसेवकांमुळे जीवनदान मिळाले. गुरूवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
सायंकाळी साडेसहापासून उठण्याण्याचा प्रयत्न करणारी एक जखमी गाय रस्त्याच्या कडेला पडली होती. मात्र, तीला उठता येत नव्हते. अशातच भटकी कुत्रे तीच्यावर हल्ला करत असताना तेथून जाणाऱ्या महाविद्यालयीन तरूण-तरूणींनी कुत्र्यांचा तावडीतून तीची सुटका केली. तीला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती उठू शकली नाही. तीच्या डोळ्याला जखम झाली होती.
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (अ) वाहतुक आघाडी संलग्न कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॅन्ड चे भव्य उद्घाटन
- अवैध पार्कींग करणाऱ्यांवर कारवाईची व देहूरोड फाट्यावर सिग्नल बसविण्याची मागणी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला पिंपळे सौदागरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
- विठाईच्या माध्यमातून वाचन संस्कृतिची जपणूक – कुंदाताई भिसे
गाईवर उपचार करण्यासाठी तरूणांनी खासगी व महापालिका प्राण्यांचे डॉक्टर व अॅनिमल एनजीओंना संपर्क केला. मात्र, सर्वांनी त्याठिकाणी येण्यास असमर्थता दर्शवली. महाविद्यालयीन तरूणांची गर्दी पासून अनेक नागरिक त्याठिकाणी गोळा झाले. काहींनी गाईला पाणी पाजले, केळी खाण्यास दिली. तसेच गाईजवळ शेकोटी केली.
दरम्यान, याबाबत बजरंग दल व आरएसएसचे अंजन वालधर, वैभव गुजर, प्राणी मित्र विक्रम भोसले यांना समजताच ते काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. गाईला उपचाराची गरज असल्याने टेम्पोतून भोसरीतील पांजपोळ गो-शाळेत तीला रवाना केले. त्यानंतर सायंकाळी साडेसहापासून त्याठिकाणी थांबलेले महाविद्यालयीन तरूण आपआपल्या घरी गेले.