साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती

नवी दिल्ली, (लोकमराठी) : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे, इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

एकूण 21 सदस्यांची ही समिती आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भोपाळमध्ये पराभव केला होता.

सध्या त्यांच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची प्रकरणे आहेत.

Actions

Selected media actions