संविधानाचा अपमान व अंधश्रध्दा पसरवल्याबद्दल या महिला पोलीसांवर गुन्हा दाखल होऊ शकतो?

संविधानाचा अपमान व अंधश्रध्दा पसरवल्याबद्दल या महिला पोलीसांवर गुन्हा दाखल होऊ शकतो?

पुणे : महिला पोलीसांनी वटपोर्णिमेला वडाच्या झाडाची पुजा केली असल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. मात्र, यामुळे संबंधित महिला पोलीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र पोलीस खात्याच्या शासकीय गणवेशात या महिला पोलीसांनी संविधानाचा अपमान केला असून गणवेशात अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केले आहे. असा आरोप विनायक कांडाळकर यांनी केला आहे.

विनायक कांडाळकर यांनी म्हटले आहे की, संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला घरात दिले आहे. तुम्ही शासकिय गणवेशात विशीष्ट एका धर्माचा कार्यक्रम करु शकत नाही. कारण तुम्ही पोलिस भरती झाल्यानंतर संविधानाचे पालन करण्याची व धर्मनिरपेक्ष काम करण्याची जाहीर शपथ घेतली आहे. आणि आज आपण शासकिय वर्दीमध्ये वटपोर्णिमेला वडाच्या झाडाची पुजा करुन आपण विशीष्ट एका धर्माचे पालन करत असल्याचे वर्दीतील फोटो टाकून साक्ष दिली आहे. आपण केवळ वर्दीचाच अपमान केला नसून संविधानाचा देखील अपमान केला आहे. तसेच अंधश्रध्दा पसरवण्याचे देखील काम वर्दीमध्ये ड्युटीवर असताना केले आहे. म्हणुन तुमच्यावर गुन्हा दाखल का करु नये?