धक्कादायक : पैसे कमी दिल्याने सर्पमित्राने सोडून दिला विषारी नाग (व्हिडिओ)
तर दुसऱ्या घटनेत सर्पमित्राने नागांना दिले जीवनदान; दोन्हीही घटना पुण्यातील
एका घटनेत वेगवेगळ्या सर्पमित्रांना एक बदनाम करणारा तर, दुसरा निसर्ग वाचविणारा
पुणे (लोकमराठी) : एका सर्पमित्राने नागरिकांनी पैसे कमी दिल्याने पकडलेला साप व त्याच्याजवळील साप पुन्हा त्याच ठिकाणी सोडून दिल्याची घटना सोमवारी (ता. २५) हडपसरमध्ये घडली. तर या उलट काळेेवाडीत एका सर्पमित्राने जाळीत अडकलेल्या नागाची सुटका करत नागाला जीवनदान दिले. या दोन्हीही घटना पुण्यातील आहेत.
पहिली घटना हडपसरमधील असून साप दिसल्याने स्थानिकांनी सर्पमित्र राजेंद्र परदेशी याला कॉल केला. सर्पमित्र घटनास्थळी आला आणि धामण जातीचा बिनविषारी साप पकडला. ठराविक कॉल चार्ज 200 रुपये असतो राजेंद्र ने 300 रुपयांची मागणी केली. त्यामुळे स्थानिकांनी 100 रुपये कमी दिल्याचा राग डोक्यात घेत दुसरीकडे पकडलेला नाग जातीचा विषारी साप आणि तेथे पकडलेल...