धक्कादायक : पैसे कमी दिल्याने सर्पमित्राने सोडून दिला विषारी नाग (व्हिडिओ)

  • तर दुसऱ्या घटनेत सर्पमित्राने नागांना दिले जीवनदान; दोन्हीही घटना पुण्यातील
  • एका घटनेत वेगवेगळ्या सर्पमित्रांना एक बदनाम करणारा तर, दुसरा निसर्ग वाचविणारा
धक्कादायक : पैसे कमी दिल्याने सर्पमित्राने सोडून दिला विषारी नाग (व्हिडिओ)

पुणे (लोकमराठी) : एका सर्पमित्राने नागरिकांनी पैसे कमी दिल्याने पकडलेला साप व त्याच्याजवळील साप पुन्हा त्याच ठिकाणी सोडून दिल्याची घटना सोमवारी (ता. २५) हडपसरमध्ये घडली. तर या उलट काळेेवाडीत एका सर्पमित्राने जाळीत अडकलेल्या नागाची सुटका करत नागाला जीवनदान दिले. या दोन्हीही घटना पुण्यातील आहेत.

पहिली घटना हडपसरमधील असून साप दिसल्याने स्थानिकांनी सर्पमित्र राजेंद्र परदेशी याला कॉल केला. सर्पमित्र घटनास्थळी आला आणि धामण जातीचा बिनविषारी साप पकडला. ठराविक कॉल चार्ज 200 रुपये असतो राजेंद्र ने 300 रुपयांची मागणी केली. त्यामुळे स्थानिकांनी 100 रुपये कमी दिल्याचा राग डोक्यात घेत दुसरीकडे पकडलेला नाग जातीचा विषारी साप आणि तेथे पकडलेली धामण असे एकूण दोन साप स्थानिकांच्या सोसायटी मध्ये सोडून पळून गेले, व परत तुमच्या इथे कोणी सर्पमित्र साप पकडण्यासाठी येणार नाही अशी धमकी दिली. या घटनेचे CCTV कॅमेऱ्यात चित्रीकरण झालेले असून असून स्थानिक नागरिक , निसर्गमित्र, पर्यावरण संस्था या घटनेचा निषेध करत आहेत.

तर दुसरी घटना पिंपरी चिंचव मधील काळेवाडी फाट्यावरील आहे. म्हशींच्या गोठ्यात उंदीरांचा वावर वाढल्याने शेतकऱ्याकडून नायलॉनचे जाळे लावण्यात आलेले. पण यात दोन विषारी जातीचे नाग साप कित्तेक तास अडकले होते. अतिशय हुशारीने ब्लेडचा वापर करत वाईल्ड ऍनिमल स्नॅक प्रोटेक्शन सोसायटीचे सदस्य सर्पमित्र ओंकार भूतकर व सहकारी सुरज भारती यांनी निशुल्क, निःस्वार्थ भावनेने केले, नायलॉन जाळीचा एक-एक धागा कापत दोन्ही सापांची इजा न होऊ देता सुटका केली.

स्वयंघोषित सर्पमित्रांवर वनखात्याने आळा घालावा. खास करून इस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक सारख्या सोशल माध्यमांवर लाईक कमेंट मिळवण्यासाठी चाललेला निर्दयी खेळ थांबवावा. अशी मागणी निसर्गमित्रांकडून होत आहे.