HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेज येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ कार्यशाळा संपन्न.
हडपसर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे,एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे- २८ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० मार्च २०२५ रोजी जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्रो.डॉ. संगीता अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय जगताप हे होते.
सत्र-१ ले
पहिल्या सत्रात प्रो.डॉ. संगीता अहिवळे यांनी ‘लिंगभाव व जैविक वास्तव’ या विषयावर उपस्थित महाविद्यालयातील राष्ट्रीय एक दिवसीय मार्गदर्शन केले. आपल्या विषयाला अनुसुरून त्यांनी जैविक दृष्ट्या लिंग व सामजिक दृष्ट्या लिंगभाव ही संकल्पना सविस्तर सांगून विज्ञा...