शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

PIMPLE SAUDAGAR : पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेजमध्ये दिंडी सोहळा उत्साहात साजरा
शैक्षणिक

PIMPLE SAUDAGAR : पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेजमध्ये दिंडी सोहळा उत्साहात साजरा

पिंपरी, दि. 28 जून 2023 : पिंपळे सौदागर येथील वै. ह.भ.प पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेज मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. असा हा सुख सोहळा अनुभवण्यासाठी पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेज मधील विदयार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणी, वारकरी, संत तुकाराम महाराज तर काही विदयार्थ्यांनी नऊवारी साडी, धोतीकुर्ता अशी वेशभूषा करत हातात टाळ मृदूंग तसेच डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन "ज्ञानोबा माऊली,ज्ञानराज माऊली तुकाराम ” तसेच “ विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल " असा नामघोष करत टाळ व मृदूंगाच्या गजरात रिंगण सोहळ्यात सहभागी ह...
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाहू महाराजांना अभिवादन
शैक्षणिक

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाहू महाराजांना अभिवादन

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्या शिंनगारे, शाळेच्या मुख्याध्यापिका नाझमीन शेख व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी विश्वजीत काटे याने शाहू महाराज यांच्या जीवनावरती पोवाडा गायला, तसेच प्रियंका शहाबादे व प्रज्ञा शिरोडकर यांनी शाहू महाराजांविषयी माहिती सांगितली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना अरुण चाबुकस्वार म्हणाले; माणसांवर माणूस म्हणून प्रेम करणारे शाहू महाराज हे मोठ्या मनाचे राजे होते, सर्वसामान्य माणसाला राज्यात मान व विद्व...
प्रादेशिक मानसिक रुग्णालयास एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट 
शैक्षणिक, पुणे

प्रादेशिक मानसिक रुग्णालयास एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविदयालयातील मानसशास्त्र विभागाचे विद्यार्थी व शिक्षकांनी प्रादेशिक मानसिक रुग्णालय येरवडा येथे भेट दिली. सदर भेटीमध्ये सर्व विदयार्थ्यांना रुग्णालयाची परिपूर्ण माहिती रुग्णालयाचे सामाजिक अधिकारी मोहन बनसोडे यांनी दिली. रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया, नवीन कायद्या संदर्भातील माहिती, तसेच रुग्णांची दैनंदिन दिनचर्या याविषयी प्रात्यक्षिक दाखविले. रुग्णांसाठी उपचार पध्दती कोणत्या स्वरूपात दिल्या जातात उदा: डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, स्पंज थेरपी याची माहीती दिली. तसेच त्या रुग्णांना उपचार पद्धती कशा प्रकारे उपयोगी पडते यांची माहीती दिली. रुग्णालयामध्ये असलेल्या महिला रुग्ण व पुरुष रुग्ण यांचे विकृती संदर्भात : वर्तन कसे होते. यांची माहिती दिली. त्यांना दिला जाणारा आहार आणि त्यांचे वेळापत्रक यांची माहिती दिली. ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री. अंकुश कारकर यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे पाटील यांनी दोन्ही सत्कारमूर्ती यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे यांनी दोन्ही सत्कारमूर्तीना शुभेच्छा दिल्या. भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री.अंकुश कारकर यांनी नोकरीला नोकरी न समजता रयत शिक्षण संस्थेत सेवा म्हणून काम केले. हे रयतेचे दोन्ही गुणी सेवक असल्याचे गौरवउद्गार प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी काढले. याप्रसंगी अनंतराव पवार कॉलेज पिरंगुट येथील प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी म्हणाल्य...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम वडगाव मधील शाळांमध्ये संपन्न
शैक्षणिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम वडगाव मधील शाळांमध्ये संपन्न

वडगाव मावळ, दि.२८ (लोकमराठी) - 'परीक्षा पे चर्चा' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रम वडगाव मधील न्यू इंग्लिश स्कूल &ज्युनियर कॉलेज व रमेशकुमार सहानी इंग्लिश मिडीयम स्कूल या दोन्ही शाळांमध्ये हा कार्यक्रम विध्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने दाखवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विध्यार्थ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक विध्यार्थी व शिक्षक यांना सुद्धा या कार्यक्रमाचा अभ्यास पूर्वक अनुभव पाहायला मिळाला. परीक्षेदरम्यान निर्माण समस्यांना कशा प्रकारे सामोरे जावे, अभ्यासाची सुरुवात कशाप्रकारे केली पाहिजे, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे नियोजन कशाप्रकारे केले पाहिजे या संदर्भातील एकंदरीत विविध उदाहरणांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सदुपयोग विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष अनंता कुडे, मा. सभापती गुला...
एस. एम. जोशी कॉलेजमधील 2 MAH BN NCC विभागातील विद्यार्थ्यांची दिल्ली येथील रिपब्लिक डे 23 परेडसाठी निवड
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील 2 MAH BN NCC विभागातील विद्यार्थ्यांची दिल्ली येथील रिपब्लिक डे 23 परेडसाठी निवड

हडपसर (प्रतिनिधी) : भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुरमु यांच्या उपस्थितीत 74 वा प्रजासत्ताक दिन राजपत दिल्ली येथे संपन्न होणार आहे. 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेड मध्ये एस. एम. जोशी कॉलेजमधील राष्ट्रीय छात्र सेनेमधील तीन कॅडेट्स सहभागी होणार आहेत. यावर्षीचा विशेष बहुमान प्राप्त झालेले एस. एम. जोशी कॉलेजमधील सुरज बाळासाहेब घरत, निखिल अशोक घटी, गिरीश नंदविजय लाड हे तीन कॅडेट्स आहेत. एकूण 250 कॅडेट्स मधून 2- महाराष्ट्र बटालियन व एनसीसी विभाग एस. एम. जोशी कॉलेज हडपसर यांच्या तीन कॅडेट्सची निवड राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी झाली आहे. या सर्व कॅडेट्सचे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे, जनरल बॉडी सदस्य मा. दि...
विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय 
पुणे, शैक्षणिक

विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय

हडपसर (प्रतिनिधी) : विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 ही स्पर्धा दि. 5 व 6 डिसेंबर 2022 रोजी BJS कॉलेज वाघोली येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पारितोषिके मिळवणारे महाविद्यालय म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला. विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामूहिक लोकनृत्य (folk dance) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक एकांकिका (one act play) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक मूकनाट्य (Mime) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक प्रहसन (skit) कला प्रकारात द्वितीय पारितोषिक व वैयक्तिक कात्रण (collage) कला प्रकारात द्वितीय पारितोषिक मिळविले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांमध्ये पारितोषिके मिळवून येथील एस. एम. जोशी महाविद्या...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिवस संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिवस संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावा लागतो. प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर सन्मान प्राप्त होतो.कितीही अडचणी आल्या तरी यशाचा मार्ग सोडू नका.रागात कोणताही निर्णय घेऊ नका. स्वतःवर प्रेम करा. तरच इतरांबद्दल आपण सहिष्णुता ठेवू शकतो, असे विचार मुनेश मोहन कालिया यांनी मांडले. ते एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन .एस. गायकवाड होते. ते म्हणाले की, सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सहिष्णुतेची भावना फार महत्त्वाची आहे.सर्वधर्मसमभाव जोपासणे ही सुद्धा सहिष्णुतेची भावना आहे.जगात भारत देश त्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रास्ताविक डॉ. निशा गोसावी यांनी केले. आभार डॉ. एस. बी. जगताप यांनी मानले. या समारंभाला सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यालयीन सेवक उपस्थित होते. ...
‘मी युथ आयकॉन : माझी उत्कृष्ट कामगिरी’ या स्पर्धेमध्ये श्रुती अक्कलकोटेला उत्तेजनार्थ पारितोषिक
पुणे, शैक्षणिक

‘मी युथ आयकॉन : माझी उत्कृष्ट कामगिरी’ या स्पर्धेमध्ये श्रुती अक्कलकोटेला उत्तेजनार्थ पारितोषिक

हडपसर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फले पुणे विद्यापीठ, पुणे आणि ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट बारामती शारदाबाई पवार महिला महाविद्यालय यांच्या वतीने दि. 16 ते 19 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संपन्न झालेल्या स्वयंसिद्धा युवती संमेलनामध्ये महाराष्ट्रातील विविध 93 महाविद्यालयातून 1,875 विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या. या निवासी शिबिरामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमधील दहा विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये मी युथ आयकॉन: माझी उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेजमधील कु. श्रुती बसवराव अक्कलकोटे ह्या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ पारितोषिक आणि ट्रॉफी मिळाली. या स्पर्धेसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिल्पा शितोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अतुल चौरे, उपप...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पक्षी सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पक्षी सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न

हडपसर 16 (प्रतिनिधी) : पक्षी निरीक्षण हा आनंददायी छंद आहे. लोकांनी वेळ काढून तलाव, माळरान, जंगल, पाणथळ जागेत जाऊन पक्षांचे निरीक्षण करावे. असे विचार वाडिया कॉलेजचे प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांनी अध्यक्ष म्हणून बोलताना सांगितले की, भारताच्या भूमीत विविध प्रकारचे पक्षी आपण पाहतो. जैवविविधता आपण समजून घेतली पाहिजे. पक्षांचे संवर्धन आपण केले पाहिजे. असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. अशोक पांढरबळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सोपान ऐनार यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी, फोटोग्राफी, निबंध, बर्ड नेक्स्ट, मेकिंग वर्कशॉप या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम प्राणिशास्त्र विभागाने आयोजित केला होता. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. हेमलता कारकर यां...