PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षिका’

PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'आदर्श शिक्षिका' 

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिकेच्या भाटनगर प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ. जयश्री गणेश राऊत या विशेष कार्यासाठी महापालिकेकडून ‘आदर्श शिक्षिका’ ठरल्या आहेत. त्यांच्या सोळा वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी विदयार्थ्याच्यासर्वागीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबवले.

यात विशेष उपक्रम म्हणजे सध्याच्या काळात संगणक शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी मुलांना कोडिंगबाबत मार्गदर्शनावर भर दिला. त्यांचे विद्यार्थी स्क्रॅच या ऑनलाईन कोडिंग फलॅटफॉर्मवर कोडिंग करतात. तसेच त्यांनी विविध सर्जनशीलतेचा विकास घडवून आणणारे उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती या सुप्त गुणाचा विकास घडवून आणण्यासाठी राख्या बनविणे, गणेश मूर्ती बनविणे. पतंग तयार करणे, आकाशकंदिल बनविणे कागदी फुलपाखरे, पणत्या, भेटकार्ड, टाकाऊतून टिकाऊ वस्तू, कागदी पिशव्या बनविणे आईस्क्रीमच्या काड्यापासून वाॅल हैगिंग, फुलदाणी बनविणे, पेन्सिल स्टैंड, कागदी पाकीटे तयार करणे असे अनेक नानाविध उपक्रम घेतात.

PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'आदर्श शिक्षिका' 

प्रत्यक्ष कृतीतून अध्ययन अनुभवावर भर देतात, स्मार्ट TV च्या माध्यमातून डिजीटल शिक्षणाचे धडे देतात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्राणी व पक्ष्यांप्रती सहानुभुती निर्माण व्हावी म्हणून चिमणी दिवस साजरा करणे, योगासने, शैक्षणिक सहली स्वच्छता विषयक उपक्रम, नाटुकले, विविध सण समारंभ साजरे करतेसांस्कृतिक कार्यक्रम, स्वातंत्र्य सैनिक, नेते यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, वाहरिक मुलांचे, बालआनंद मेळावा, विद्यार्थी उपस्थितीसाठी पटनोंदणीसाठी फेसबुक व्होट्सअँप या समाजमाध्यमांद्वारे जाहिरात करतात .असे अनेक सहशालेय उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न नागरिक बनवण्याचे संस्कार त्या करतात. कोरोनाकाळात तीन महिने सलग कोरोना ड्यूटी केली. कोरोनाकाळात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देऊन डिजीटल पद्धतीने निकाल वाटप केले. शिक्षिका राऊत यानी स्वतःच्या युट्यूब चॅनेलद्वारे विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती केली आहे. वाढदिवसादिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक झाड लावण्यास सांगून वृक्षारोपनचे धडे दिले.

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे यांचेमार्फत होण्यात आलेल्या कोडिंग कोर्समध्ये C3F सर्टिफिकेशन कोर्स फॉर कोडींग फंडामेंटल व ICTC इंट्रोडक्शन टू कंप्यूटर thinking अँड कोडींग या उत्कृष्ट कार्यासाठी शाळेला 8 संगणकांची लॅब मिळवून दिली. पाय फाउंडेशन व ज्ञान फ्युचर इंजिनियर यांचे कडून त्यांनी केलेल्या कोडिंग कोसमध्ये पुणे जिल्हयातून प्रथम १० शिक्षकामध्ये मानांकन व PCMC मनपा मध्ये प्रथम क्रमांकाचे विशेष प्राविण्य मिळवून लॅपटॉप व कंप्यूटर किट अशा बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. या त्यांच्या विशेष कार्यामुळेच त्यांचा आज पिंपरी चिंचवड महानगरपलिका तर्फे ‘ आदर्श शिक्षक ‘ म्हणून सन्मान होत आहे.