शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त ज्येष्ठ लेखक व संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त ज्येष्ठ लेखक व संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

हडपसर, ता. २६ (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर व रयत शिक्षण संस्थेचे साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 वा जयंती सोहळा मंगळवार दि. 27 सप्टेंबर 2022 सकाळी 10:30 वाजता संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखक, दैनिक लोकमतचे संपादक मा. संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे, विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, उपविभागीय अधिकारी एस .टी. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. अशी माहिती एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी दिली....
एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रथम महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करुन 'ईवेस्ट कचऱ्याची समस्या' या विषयावर अत्यंत प्रभावी पथनाट्य तयार केले. त्यानंतर हडपसर येथील साधना संकुलातील शाळा व माळवाडी गावात जावून पथनाट्य सादर केले. या पथनाट्यास विद्यार्थी व नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पथनाट्याचे संवाद व दिग्दर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक विराज नवले याने केले. या पथनाट्यात १६ विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या १२० स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता केली. अशा प्रकारचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची प्रेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब यांनी द...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ब्युटी अँड वेलनेसचे शिबीर संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ब्युटी अँड वेलनेसचे शिबीर संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : स्वतःची ब्युटी सलून, स्पा थेरपी अँड मॅनेजमेंट, ब्युटी कौन्सेलर, मेकअप आर्टिस्ट, मेकअप ट्रेनर, हेअर ड्रेसर, हेअर डिझायनर, न्यूट्रिशन डायजेशन कन्सल्टंट, फिटनेस ट्रेनर अशा अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ब्युटी आणि वेलनेस पदवीस्तरीय कोर्स करणे आवश्यक आहे. कठोर परिश्रम करून आपण स्वावलंबी जीवन जगले पाहिजे. असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलांबरी थोरात यांनी बी.होक. विभाग आयोजित एक दिवसीय ब्युटी अँड वेलनेस च्या सेमिनारमध्ये व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले की, कौशल्यपूर्ण कोर्स करून जीवनात यशस्वी व्हा. आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. विद्यार्थ्यांना पदवीबरोबर कौशल्याचे धडे या कॉलेजमध्ये दिले जातात. आपल्या भावी जीवनासाठी कौशल्यपूर्ण शिक्...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभाग, संशोधन विभाग, ग्रंथालय विभाग व आय.क्यू.ए.सी.विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॉपीराइट आणि ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रल्हाद जाधव यांनी विद्यार्थ्यांना पेटंट, कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे महत्त्व सांगितले. तसेच तरुण पिढीला व्यवसाय करायचा असेल तर कॉपीराइट आणि ट्रेडमार्क याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी कॉपीराईट, ट्रेडमार्क याविषयाचे ज्ञान असल्यास विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजना जाधव यांनी तर आभार डॉ. एम. एन. रास्ते यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल पवार यांनी केले. कार्यक्...
एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव 
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंध, अपंग मुली-मुलांसाठी समुपदेशन, करिअर मार्गदर्शनपर सामाजिक कार्य केल्याबद्दल पुण्यातील समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल यांच्या वतीने मानसशास्त्र विभागाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. महेश देवकर, प्रा. शिल्पा कुंभार व मानसशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. शुभम तांगडे इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते....
कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना मसापचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सत्कार
पुणे, शैक्षणिक

कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना मसापचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सत्कार

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. कवी डॉ. संतोष पवार यांच्या 'नव्वदोत्तरी मराठी कविता संकल्पना स्वरूप आणि वाटचाल' या प्रबंधाला उत्कृष्ट प्रबंध लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरच्चंद्र भालेराव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. उमेश शिरसट यांना २०१९ या वर्षातील महाराष्ट्र साहित्य पत्रिकेमधील जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवरील लेखाला ताईसाहेब कदम पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ. किशोर काकडे, डॉ. राजेंद्र ठ...
बेल्जियममध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या जेबा काझी यांचा इकरा इंग्लिश स्कूलतर्फे सत्कार
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

बेल्जियममध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या जेबा काझी यांचा इकरा इंग्लिश स्कूलतर्फे सत्कार

पिंपरी, ता. १० सप्टेंबर २०२२ : जेबा शहाबुद्दीन काझी या इकरा इंग्लिश स्कूल दापोडी मधील माजी विद्यार्थीनी असून त्या दुहेरी मास्टर्स आणि पीएचडीसाठी बेल्जियमच्या केवी लेविन येथे उच्च शिक्षणासाठी जात आहेत. त्यानिमित्त त्यांचा इकरा इंग्लिश मिडीयम स्कूल दापोडीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी पुणे विभागीय रेल्वे स. समिती सदस्य विशाल वाळुंजकर, इकरा एज्युकेशन स्कूल सोसायटीचे अध्यक्ष उमेर गाजी, सेक्रेटरी सलीम शेख, कारी इकबाल, सामाजिक कार्यकर्ते गौतम माने, प्रा. अंजुम इनामदार आदी उपस्थित होते. त्याप्रसंगी जेबा गाझी म्हणाल्या की, आई वडिलांचा मिळालेला पाठिंबा महत्वाचा आहे. मुलांनी आपल्या आयुष्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करून मोठे होण्याचा विचार करावा, त्या क्षेत्रात यश न मिळाल्यास दुसऱ्या क्षेत्राचा सुद्धा निश्चित विचार करावा. असे...
शिक्षक हा शिल्पकार असतो : प्रा. डॉ. गजानन चव्हाण
शैक्षणिक

शिक्षक हा शिल्पकार असतो : प्रा. डॉ. गजानन चव्हाण

पुणे : औंध यथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. "शिक्षक दिन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०८ ते १९४९ पर्यंत शिक्षक म्हणून काम केले. शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या मनात परिवर्तन घडते. विचार करण्याची क्षमता शिक्षणाने निर्माण होते. शिक्षक हा शिल्पकार असतो. शिल्पकार या शब्दात त्याचे महत्त्व अधोरेखित होते. भाषेचे महत्त्व सांगताना नॉलेज ऑफ लॅग्वेज व यूज ऑफ लॅग्वेज असे त्यांनी सांगितले. शिक्षण विषयक तत्त्वज्ञान डॉ. राधाकृष्णन यांनी सांगितले.” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील, माजी हिंदी विभाग प्रमुख, प्रा. डॉ. गजानन चव्हाण यांनी आपल्या मनोगतात वरील उद्गार काढले. पुढे ते म्हणाले की, भाषेचे महत्त्व सांगताना नॉलेज ऑफ लॅग्वेज व यूज ऑफ लॅग्वेज असे शिक्षण...
समाजाची उंची शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून – प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड 
पुणे, शैक्षणिक

समाजाची उंची शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून – प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड

हडपसर, ता. ५ सप्टेंबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व स्टाफ वेल्फेअर समितीमार्फत करण्यात आले होते. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने कॉलेजमधील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांना गुलाब पुष्प व पेन देवून सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, प्राचीन काळापासून गुरूंबद्दलचा आदर व्यक्त केला जातो. एकोणिसाव्या शतकात भारतीय शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी व बहुजन समाजासाठी शिक्षणाची व्यवस्था सुरू केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घोलप नावाच्या विद्यार्थ्याला बरोबर घेवून आशिया खंडातील सर्वात मोठ्या ...
माणूसपण जपणारी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची – स्वाती महाळंक
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

माणूसपण जपणारी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची – स्वाती महाळंक

स्वाती महाळंक यांचे स्वागत करताना संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, यावेळी त्यांच्यासमवेत डावीकडून संस्थेचे संचालक संजय छत्रे व राजेश नागरे यशस्वी एज्युकेशन' सोसायटीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित 'संवाद शिक्षकांशी'कार्यशाळा संपन्न पिंपरी, ता. ०५ सप्टेंबर २०२२ : माणूसपण जपणारी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असून त्यादृष्टीने शिक्षकवर्गाने स्वतःला अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सेंटर फॉर इन्स्टिट्यूशनल बिल्डींग्स अँड लिडरशिप स्टडीजच्या कार्यकारी प्रमुख स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने चिंचवड येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'संवाद 'शिक्षकांशी' या एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतान...