एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त ज्येष्ठ लेखक व संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त ज्येष्ठ लेखक व संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

हडपसर, ता. २६ (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर व रयत शिक्षण संस्थेचे साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 वा जयंती सोहळा मंगळवार दि. 27 सप्टेंबर 2022 सकाळी 10:30 वाजता संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखक, दैनिक लोकमतचे संपादक मा. संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे, विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, उपविभागीय अधिकारी एस .टी. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. अशी माहिती एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी दिली.