बेल्जियममध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या जेबा काझी यांचा इकरा इंग्लिश स्कूलतर्फे सत्कार

बेल्जियममध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या जेबा काझी यांचा इकरा इंग्लिश स्कूलतर्फे सत्कार

पिंपरी, ता. १० सप्टेंबर २०२२ : जेबा शहाबुद्दीन काझी या इकरा इंग्लिश स्कूल दापोडी मधील माजी विद्यार्थीनी असून त्या दुहेरी मास्टर्स आणि पीएचडीसाठी बेल्जियमच्या केवी लेविन येथे उच्च शिक्षणासाठी जात आहेत. त्यानिमित्त त्यांचा इकरा इंग्लिश मिडीयम स्कूल दापोडीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यावेळी पुणे विभागीय रेल्वे स. समिती सदस्य विशाल वाळुंजकर, इकरा एज्युकेशन स्कूल सोसायटीचे अध्यक्ष उमेर गाजी, सेक्रेटरी सलीम शेख, कारी इकबाल, सामाजिक कार्यकर्ते गौतम माने, प्रा. अंजुम इनामदार आदी उपस्थित होते.

बेल्जियममध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या जेबा काझी यांचा इकरा इंग्लिश स्कूलतर्फे सत्कार

त्याप्रसंगी जेबा गाझी म्हणाल्या की, आई वडिलांचा मिळालेला पाठिंबा महत्वाचा आहे. मुलांनी आपल्या आयुष्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करून मोठे होण्याचा विचार करावा, त्या क्षेत्रात यश न मिळाल्यास दुसऱ्या क्षेत्राचा सुद्धा निश्चित विचार करावा. असे त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मालन रंगरेज यांनी तर सूत्रसंचालन सलीम शेख यांनी केले, तसेच आभारप्रदर्शन रुबीना शेख यांनी केले.