महाराष्ट्र

राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या
मोठी बातमी, महाराष्ट्र

राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

मुंबई (लोक मराठी न्यूज) : राज्य गृह विभागाने राज्यातील तब्बल 35 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात कोठुन कोठे बदली झाली ते ठिकाण) : बांदेकर दामोदर वसंत (रत्नागिरी ते मुंबई शहर), पाटील सुधीर भिमराव (वाशिम ते मपोअ, नाशिक), मंडलवार जयदीश शिवाजी (लोहमार्ग, औरंगाबाद ते यवतमाळ), श्रीमती माने वंदना शिवराम (बृहन्मुंबई ते ठाणे शहर), भामरे अविनाश भगवान (बुलढाणा ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), खेडकर हरिष दत्‍तात्रय (औरंगाबाद, ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), संपते प्रशांत पांडुरंग (पोप्रके, बाभळगाव, लातूर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), जाधव विजय कृष्णराव (मओप, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), वाघमारे रूपचंद मधुकर (मओअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), पाटील ...
अनधिकृत सिगारेट विक्रीसाठी 50 हजारांची लाच मागणारा पोलिस व हस्तक एसीबीच्या ताब्यात
महाराष्ट्र

अनधिकृत सिगारेट विक्रीसाठी 50 हजारांची लाच मागणारा पोलिस व हस्तक एसीबीच्या ताब्यात

पुणे : पान टपरीवर अनाधिकृतपणे सिगारेटची विक्री करतो म्हणून कारवाईचा बडगा उगारून पान टपरी चालकाकडे ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी २० हजार रूपयाची लाच खासगी इसमामार्फत स्विकारणारा पोलिस कर्मचारी आणि खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकले आहेत. त्या दोघांना लाच घेतल्यानंतर रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक संजय भिला वाघ (३८, बक्‍कल नंबर ३७३८, नेमणुक चर्तुःश्रृंगी पोलिस स्टेशन) आणि किरण प्रकाश पाले (रा. जुनी सांगवी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराची परिसरात पानाची टपरी आहे. पान टपरीवर अनाधिकृत सिगारेटची विक्री करतो म्हणुन पोलिस कर्मचारी वाघ हे तक्रारदारास कारवाईची भाषा करीत होते. कारवाई न करण्यासाठी त्यांनी ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदार यांनी अ‍ॅन्टी करप्...
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रची पालघर जिल्हा कार्यकारीणी जाहीर
महाराष्ट्र

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रची पालघर जिल्हा कार्यकारीणी जाहीर

पालघर : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या पालघर जिल्हा कार्यकारीणी पालघरचे समन्वयक ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आली. या कार्यकारिणीचा कार्यकाळ एक वर्षाचा असून ती पुढीलप्रमाणे. अध्यक्ष - चंद्रकांत खुताडे (डहाणु, दै. पुढारी), सचिव - अनिल पाटील (वाडा, शब्द प्रहार), कोषाध्यक्ष - नीता चौरे (बोईसर, दै.नवराष्ट्र, NTV मराठी) उपाध्यक्ष - विजय देसाई (वसई) समन्वयक - दीपक मोहिते (विरार, नवशक्ति) कार्यकारिणी सदस्य रुतिका वेंर्गुलेकर (विरार, लोकमत) दिलीप कवेरीया (विरार) रफिक घाची (डहाणु, डहाणु मिञ) सल्लागार - उमाकांत वाघ (विरार, दै.सामना) एनयुजे महाराष्ट्र ही एनयुजे इंडिया, नवी दिल्लीच्या सर्वात मोठ्या लढाऊ युनियनशी संलग्न असून, ब्रुसेल्सच्या इंटरनॅशनल...
जिवंत नाटकातून अनुभवला येशू ख्रिस्ताच्या दु:खमय जीवनाचा प्रवास
महाराष्ट्र

जिवंत नाटकातून अनुभवला येशू ख्रिस्ताच्या दु:खमय जीवनाचा प्रवास

अहमदनगर : एरंडगावातील (आदर्शगाव समसुद) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात फेथ ग्रुपच्या वतीने "येशू ख्रिस्ताचे दुःखसहन' (पॅशन ऑफ ख्राईस्ट) हे धार्मिक मराठी महानाट्यात सादर करण्यात आले. त्यामध्ये दाखविण्यात आलेल्या वधस्तंभवरील येशूच्या जीवन प्रवासाने आबालवृद्ध अक्षरशः हरपून गेले. महानाट्यात बायबलमधील अनेक धार्मिक प्रसंग कलाकारांनी जिवंत केले. मरण यातना सहन करूनही प्रभू येशूच्या शांतता, मानवता व प्रेमाचा संदेश या नाटिकेद्वारे देण्यात आला. ग्रामीण भागात प्रथमच सादर झालेल्या ख्रिस्ती धार्मिक जिवंत देखावा पाहण्यासाठी समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. या नाटिकेत पुणे, नाशिक, मुंबई, पिंपरी चिंचवड येथील 40 कलाकारांचा सहभाग होता. तत्कालीन वेशभूषा, उत्कृष्ट ध्वनी व प्रकाश योजनेने सादर करण्यात आलेल्या नाटीकेने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. शशिकांत रावडे यांनी येशू ख्रिताची, जॉन ...
अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – Narendra Modi
महाराष्ट्र

अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – Narendra Modi

वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi ) राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – Narendra Modi ( LokMarathi News ) महाराष्ट्रातील वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार कुठलीही कृती विचाराशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. शरद पवारांनी आधी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण हवा कुठल्या दिशेने वाहत आहे हे शरद पवारांना माहित आहे. म्हणून त्यांनी निवडणूक न लढवण्याच निर्णय घेतला असे पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिट विकेट झाले आहेत असा आरोप पं...
राजीव परीख क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र

राजीव परीख क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी

राजीव परीख क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी पुणे : क्रेडाई- महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. क्रेडाई – महाराष्ट्रची निवडणूक आज पुण्यातील कॉनरॅड हॉटेल येथे झाली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी एकमताने राजीव परीख यांची २ वर्षाच्या कालावधीसाठी निवड केली.येत्या १ एप्रिल पासून ते पदभार स्वीकारतील. यावेळी क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर,क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया तसेच ५१ शहरातील अनेक सदस्य उपस्थित होते. २०१९ -२१ या कालावधीसाठी क्रेडाई- महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष पदांच्याही निवडणुका सदरदिवशी झाल्या त्यात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात सुनील फुरडे (सोलापूर), महेश साधवानी (नागपूर),रसिक चौव्हाण (नवी मुं...
कवी किशोर कदम यांना ‘दु:खी’ पुरस्कार
मनोरंजन, महाराष्ट्र

कवी किशोर कदम यांना ‘दु:खी’ पुरस्कार

राज्यपातळीवरील विसावा राय हरिश्चंद्र साहनी ऊर्फ ‘दु:खी’ काव्य पुरस्कार या वर्षी किशोर कदम (सौमित्र) यांना कवितेतील योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. येत्या ६ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाटय़गृहात कादंबरीकार रंगनाथ पाठारे यांच्या हस्ते हा पुरस्कार ‘कवितेचा पाडवा’ कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे निमंत्रक अभय साहनी, विनीत साहनी आणि कवयित्री संजीवनी तडेगावकर आहेत. या निमित्ताने आयोजित कविसंमेलनात विजय चोरमारे, सुमती लांडे, शोभा रोकडे, बालाजी सुतार, भरत दौंडकर, आबा पाटील, समाधान इंगळे सहभागी होणार आहेत. संजीवनी डहाळे यांचे चित्रप्रदर्शन आणि विलास भुतेकर, कालिदास वेदपाठक, ज्ञानेश्वर गिराम यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे....
पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार दिल्लीत ठरणार
ताज्या घडामोडी, पुणे, महाराष्ट्र

पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार दिल्लीत ठरणार

काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करता आलेला नाही. पक्षाकडून प्रारंभी पाच नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली होती. काँग्रेस पक्षातून पुणे लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार ठरणार, याबाबतचा घोळ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अखेर उमेदवारीचा निर्णय दिल्लीतून घेतला जाणार असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र उमेदवारी कधी जाहीर होणार, याबाबतची संदिग्धता कायम आहे. दरम्यान, प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी झाली. काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करता आलेला नाही. पक्षाकडून प्रारंभी पाच नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली होती. त्यापैकी माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड आणि ...
मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’

लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीत महिलाराज दिसून येत आहे. प्रशासकीय आणि संबंधित विभागातील मूळ जबाबदारी सांभाळून महिला अधिकारी सक्षमपणे निवडणुकीचे अतिरिक्त कामकाज सांभाळत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी कविता द्विवेदी यांची नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासह विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. सन २०१७ पासून पीएमआरडीएत त्या कार्यरत आहेत. विविध निवडणुकींसाठीही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे मावळ मतदारसंघाची मुख्य जबाबदारी आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात हा मतदारसंघ विभागला...
मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे

खासदार बारणे यांच्या मावळ तालुक्यातील प्रचाराचा विजय शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ पिंपरी, 29 मार्च – बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देता गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवारी) वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार बारणे यांच्या प्रचाराचा शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गो-हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी उपनराध्यक्ष ...