जिवंत नाटकातून अनुभवला येशू ख्रिस्ताच्या दु:खमय जीवनाचा प्रवास

अहमदनगर : एरंडगावातील (आदर्शगाव समसुद) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात फेथ ग्रुपच्या वतीने “येशू ख्रिस्ताचे दुःखसहन’ (पॅशन ऑफ ख्राईस्ट) हे धार्मिक मराठी महानाट्यात सादर करण्यात आले. त्यामध्ये दाखविण्यात आलेल्या वधस्तंभवरील येशूच्या जीवन प्रवासाने आबालवृद्ध अक्षरशः हरपून गेले.

जिवंत नाटकातून अनुभवला येशू ख्रिस्ताच्या दु:खमय जीवनाचा प्रवास

महानाट्यात बायबलमधील अनेक धार्मिक प्रसंग कलाकारांनी जिवंत केले. मरण यातना सहन करूनही प्रभू येशूच्या शांतता, मानवता व प्रेमाचा संदेश या नाटिकेद्वारे देण्यात आला. ग्रामीण भागात प्रथमच सादर झालेल्या ख्रिस्ती धार्मिक जिवंत देखावा पाहण्यासाठी समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

या नाटिकेत पुणे, नाशिक, मुंबई, पिंपरी चिंचवड येथील 40 कलाकारांचा सहभाग होता. तत्कालीन वेशभूषा, उत्कृष्ट ध्वनी व प्रकाश योजनेने सादर करण्यात आलेल्या नाटीकेने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. शशिकांत रावडे यांनी येशू ख्रिताची, जॉन साळवी यांनी यहूदाची, कॅलन सॉरेस यांनी पेत्राची, कीर्ती ठाकूर यांनी मारिया, राहुल खंडागळे यांनी पंत पिलाट, मायकल मकासरे यांनी परूशी यांनी भूमिका साकारली.

जिवंत नाटकातून अनुभवला येशू ख्रिस्ताच्या दु:खमय जीवनाचा प्रवास

फेथ ग्रुपचे संस्थापक ब्रदर नोएल व्हॅन्हॅलट्रन व पत्रकार आशा साळवी यांचा सरपंच संतोष धस व ग्रामपंचायत सदस्या आशा गुजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच आप्पासाहेब गजभीव, ग्रामसेविका आर. बी. झिरपे, सुरेश गजभीव, ग्रामपंचायत सदस्य नंदुलाल गरोटे, संदीप काकडे, गणेश कुरुंद, शोभा गजभीव, विद्या धस, सविता क्षीरसागर, अनिता गजभीव, अमोल धस, अमोल गजभीव, अभिजित गजभीव आदी उपस्थित होते. दरम्यान, सकाळी नऊ वाजता फेथ ग्रुपच्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

जिवंत नाटकातून अनुभवला येशू ख्रिस्ताच्या दु:खमय जीवनाचा प्रवास