मुख्यमंत्र्यांकडून वंचित आघाडीला बळ – पृथ्वीराज चव्हाण
पुणे (लोकमराठी) : लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित आणि भाजपचे काय संबंध होते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितला बळ येत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे विंचीत बहुजन आघाडी हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष होईल असा दावा केला. त्यावर चव्हाण म्हणाले, "वंचित आघाडी वाढावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. लोकसभेत त्यांचे काय संबंध होते हे लोकांना माहिती आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे जागा वाटपासाठी अजून चर्चा झालेली नाही. तसेच आणखी आघाडीत कोणाला घ्यायचे हे ठरलेले नाही.''
''मुख्यमंत्री फडणवीस हे अमित शहांप्रमाणे सामा दाम दंड भेद वापरून विरोधी पक्षातील नेत्यांना धमकाऊन भाजपमध्ये घेत आहेत. विरो...