मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’
लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीत महिलाराज दिसून येत आहे. प्रशासकीय आणि संबंधित विभागातील मूळ जबाबदारी सांभाळून महिला अधिकारी सक्षमपणे निवडणुकीचे अतिरिक्त कामकाज सांभाळत आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी कविता द्विवेदी यांची नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासह विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. सन २०१७ पासून पीएमआरडीएत त्या कार्यरत आहेत. विविध निवडणुकींसाठीही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे मावळ मतदारसंघाची मुख्य जबाबदारी आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात हा मतदारसंघ विभागल...