महाराष्ट्र

उद्योजकांनी जागतिक दर्जाचे उत्पादन निर्यात केल्याने उद्योग क्षेत्रात राज्य अग्रगण्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई
महाराष्ट्र

उद्योजकांनी जागतिक दर्जाचे उत्पादन निर्यात केल्याने उद्योग क्षेत्रात राज्य अग्रगण्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई

राज्यातील उद्योजकांनी जागतिक दर्जाचे उत्पादन निर्माण करुन ते निर्यात केले आणि जागतिक बाजारपेठ काबीज केल्याने महाराष्ट्र राज्य देशात उद्योगात प्रथम असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. जागतिक व्यापार केंद्र येथे उद्योग विभागामार्फत आणि जागतिक व्यापार केंद्राच्या सहकार्याने आयोजित राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांना राज्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, निर्यात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे प्रवीण दराडे जागतिक व्यापार केंद्राच्या वरिष्ठ संचालक रूपा नाईक, विजय कलंत्री आदी उपस्थित होते. उद्योग मंत्री श्री देसाई, राज्यमंत्री कु. तटकरे यांनी निर्यातीला चालना देणा-या एक्स्पोर्ट वेब पोर्टल (EXPORT WEB PORTAL)चे अनावरण केले. तसेच एक जिल्हा एक उत्पादन या पुस्तकाचे प्रकाशन केले. राज्यातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 34 उद्दोजकांना ...
मराठवाडा, विदर्भातील प्रकल्पांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्र

मराठवाडा, विदर्भातील प्रकल्पांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

 राज्यातील मराठवाडा, विदर्भ येथील प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही त्याचबरोबर अनुशेषदेखील पूर्ण केला जाईल, विदर्भासाठी 26 टक्के निधी, तर मराठवाड्यासाठी 18.75 टक्के तर उर्वरित महाराष्ट्रासाठी 55 टक्के निधी दिला असून कोणावरही अन्याय केला नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी 260 अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर राज्यातील प्रादेशिक असमतोल मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प, पाणी प्रश्न, रस्ते, पर्यटन विकास आणि शेतकऱ्यांना पॅकेज, कृषी योजना, सहकार या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर उत्तर दिले. कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या लिलावाबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या कारखान्याचा लिलाव करण्यात आला असून मूळ किमतीपेक्षा अधिक किमतीने हा कारखाना विकला गेला याची माहितीही त्यांनी यावेळी द...
ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश
महाराष्ट्र

ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश

१४ गावातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणार ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात येणार असल्याची अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. याबाबत सर्व बाबींची तपासणी आणि कार्यवाहीची सूचना दिली जाईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. याबाबत सदस्य प्रमोद पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सर्वश्री गणेश नाईक, डॉ. बालाजी किणीकर, रवींद्र चव्हाण यांनी सहभाग घेतला. ठाणे महानगरपालिकेलगत असलेली 14 गावे अगोदर नवी मुंबई महानगरपालिकेतच होती. मात्र त्यावेळी गावकऱ्यांनी आंदोलने केल्यामुळे ती नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यामुळे या गावांमध्ये रस्ते, पाणी, दिवा...
शक्ती विधेयकाला बळकटी देणारे महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक 2020 मंजूर – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
महाराष्ट्र

शक्ती विधेयकाला बळकटी देणारे महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक 2020 मंजूर – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने शक्ती विधेयक नुकतेच मंजूर केले होते. आता या शक्ती विधेयकाला बळकटी आणण्यासाठी विधानपरिषद तसेच विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सन 2020 चे विधेयक क्र. 52 “महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, 2020” मांडले. या विधेयकास विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. या विधेयकातील तरतुदीनुसार विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येईल, तसेच महिला अत्याचार प्रकरणातील अपराधाचे गांभीर्य ओळखून त्याचा तपास विशेष पथकाकडे देण्याची महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. हे विधेयक मांडत असताना गृहमंत्री श्री.पाटील म्हणाले की, राज्यातील महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतूने राज्य सरकारने विधेयक क्र. 21 – शक्...
विकासकामे करून दाखवणारे सरकार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र

विकासकामे करून दाखवणारे सरकार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

निवडणूक आली की अनेक घोषणा केल्या जातात नंतर विसरून जातात असे महाविकास आघाडी सरकार नाही. केवळ घोषणा करणारे नव्हे तर काम करून दाखवणारे महाविकास आघाडीचं शासन आहे. मुंबईकरांच्या हिताच्या सर्व गोष्टी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले. 293 अन्वये प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, मुंबईचा एवढा गांभीर्याने विचार आतापर्यंत कुणीच केला नाही. मुंबईसाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष केला मग ते गिरणी कामगार असतील, इतर काबाडकष्ट करणारे असतील, ज्यांनी घाम गाळला, रक्त सांडले त्यांचा विचार कुणीच केला नव्हता, तो विचार या सरकारने गांभीर्याने केला. हा विचार कागदावर न ठेवता प्रत्यक्षात आणणारे हे शासन असून कामाला गती देण्यात आली आहे, त्यासाठी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून मला अभिमान वाटतो, ...
महावितरणचे निवृत्त संचालक दिनेश साबु यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी दिले आदेश
महाराष्ट्र

महावितरणचे निवृत्त संचालक दिनेश साबु यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी दिले आदेश

महानिर्मितीचे सीएमडी करणार उच्चस्तरीय चौकशी महावितरणचे निवृत्त संचालक (संचालन) दिनेश साबु यांनी साडे तीन हजार कोटी रुपयांचा वीज खरेदी घोटाळा करून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपांची त्रयस्थ अधिकाऱ्यांद्वारे चौकशी करून उचित कारवाई करण्याची महत्वपूर्ण घोषणा आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार यांना निलंबित केल्यानंतर लगेच माजी संचालक(संचलन) यांच्यावरील आरोपांची चौकशी जाहीर केल्याने महावितरणमधील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही हा संदेश त्यांनी दिला आहे. "महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यामार्फत साबू यांच्यावरील आरोपांची मुद्देनिहाय चौकशी करण्यात येईल", अशी महत्वपूर्ण घोषणा डॉ. राऊत यांनी आज विधानसभेत या विषयी उपस्थित लक्षवेधी सूचनेवर बोलताना केली. " खंदारे यांचा चौकशी अहवाल शासनास पाठविण्यात येईल आणि पुढ...
कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या ३ हजार ठेवीदारांना ६३.५२ कोटी रुपयांचे वाटप – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
महाराष्ट्र

कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या ३ हजार ठेवीदारांना ६३.५२ कोटी रुपयांचे वाटप – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांच्या ५ लाखांपर्यंतच्या ठेवी देण्यासाठी डीआयसीजीकडून ३७४.०५ कोटी रुपयांची रक्कम बॅंकेस प्राप्त झाली असून या रकमेचे ठेवीदारांना वाटप सुरु करण्यात आले आहे. १० मार्चपर्यंत ३ हजार ६५ ठेवीदारांना ६३.५२ कोटींचे वाटप करण्यात आले आहे, उर्वरित वाटपाचे काम बॅंकेच्या स्तरावर सुरु असल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर व अन्य सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या तपासणीत कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत आर्थिक अनियमितता आढळून आली, त्यानंतर बॅंकेवर आर्थिक निर्बंध आणले. बॅंकेच्या अर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांची नियुक्ती केली, त्यांनी एकूण २० दोषी व्यक्तींविरुद्ध ५२९.३६ कोटी रुपये ...
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू – प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले
महाराष्ट्र

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू – प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले

कर्जत, ता. २४ (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू शकतो. याचाच एक भाग म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने राबविलेला घनवन प्रकल्प हा एक स्तुत्य उपक्रम आहे. असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी आणि कर्जत नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथील छत्रपती नगर येथे मियावाकी (घनवन प्रकल्प) हजारो वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते, सचिव राजेंद्र जगताप, संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काळदाते, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, गटविकास अधिकारी अमोल जाधव, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल, दादा पाटील महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग प्रमुख मेजर संजय चौधरी, नगराध्यक्षा उषा राऊत, नग...
धनंजय मुंडेंवर आता दुहेरी जबाबदारी! बीडसह ना. मुंडे आता परभणीचेही पालकमंत्री!
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंवर आता दुहेरी जबाबदारी! बीडसह ना. मुंडे आता परभणीचेही पालकमंत्री!

बीड जिल्ह्यासह परभणी जिल्ह्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - धनंजय मुंडे मुंबई (प्रतिनिधी) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणखी एक जबाबदारी दिली असून, त्यांना परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्त करण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना ही माहिती दिली होती, त्यानंतर आज या बाबतचा शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे. राज्यभरात वक्तृत्व आणि कर्तृत्वातून वेगळा नावलौकिक प्रस्थापित केलेले नेते म्हणून धनंजय मुंडे यांची वेगळी ओळख आहे, त्याचबरोबर राज्यभरात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्याला लागून असलेल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे ना. मुंडेंकडे सोपवल्याने निश्चितच धनंजय मुंडे यांची ताक...
समाजकार्यासह सिटिजन सोशल रिस्पाँन्सिबिलिटी ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी – राज्यपाल
महाराष्ट्र

समाजकार्यासह सिटिजन सोशल रिस्पाँन्सिबिलिटी ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी – राज्यपाल

मुंबई : सीएसआरतंर्गत समाजासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या कॉपोरेट कंपन्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित द सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार – 2021 सोहळा आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या व्यतिरिक्त माजी वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सयाजी शिंदे, समाजसेवक . डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे आणि द सीएसआर जर्नलचे संपादक अमित उपाध्याय, मुंबई पोलिस कमिश्नर संजय पांडे, राज्याच्या संसर्गजन्य प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ प्रदीप आवटे आदी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. आपल्या देशात आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर राखणे ही सुद्धा आपली एक सामाजिक ...